महेश तिवारी, (प्रतिनिधी)
गडचिरोली, 25 मार्च: धोकादायक कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून बहुतांश लोक मास्कचा वापर करत आहेत. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी लवेगळी शक्कल लढवली आहे. त्यांनी जंगलातील झाडांच्या पानांपासून नैसर्गिक मास्क तयार केलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या बस्तरच्या अतिदुर्गम भागात राहणारे आदिवासी नागरिक झाडांच्या पानापासून मास्क तयार करुन ते वापरत असल्याचे दिसून आले आहे. आदिवासी भागात नागरिकांकडे आरोग्याच्या सुविधा नाहीत. या सुविधा नसल्या तरी कोरोनापासून वाचण्यासाठी आदिवासी नागरीकांनी जनजागृती सुरु करत स्वतःच नैसर्गिक संसाधनाचा वापर करुन मास्क तयार केले आहे. इथल्या नागरिकांनी चक्क झाडांच्या पानांचे मास्क बनवून त्याचा वापर सुरु केला आहे. नाका-तोंडाला झाडांची पाने बांधून, हे नागरिक संसर्गापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा..सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोजचा कोरोनामुळे मृत्यू, मुंबईत दिली होती पार्टी
छत्तीसगडमधील अबुझमाड हा घनदाट जंगल परिसर आहे. या जंगलाला माओवांद्यांची राजधानी असंही संबोधलं जातं. येथे अनेक आदिवसाी राहतात. मात्र या आदिवासी नागरिकांपर्यत प्रशासनाच्या सुविधा पोहोचत नाहीत.
या नागरिकांपर्यंत कोरोना व्हायरसची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:हून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. हा अतिसंवेदलशील आणि नक्षलग्रस्त भाग असल्याने येथे कुणी मास्क वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा परिसरातील भर्रीटोला गावात लोकांनी झाडांच्या पानांपासून मास्क बनवून ते वापरण्यास सुरुवात केली.
हेही वाचा..कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू? काय आहे फोटोमागची कथा
आदिवासी नागरिक गावात सभा आयोजित करुन नागरिकांना कोरोनाविषयी माहिती देऊन जनजागृती आहेत. कोरोनामुळे मास्कचा तुटवटा असला तरी आदिवासी समाजाने पानांपासून तयार केलेल्या मास्क सोशल मीडियात प्रसिद्ध झाला आहे. दिवसभर वापरल्यानंतर हे मास्क जाळून टाकला जातो असेही येथीन नागरिक सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.