Home /News /pune /

Delta plus चा धोका वाढत असताना पुण्यात तातडीने सुरू झालं मोठं काम

Delta plus चा धोका वाढत असताना पुण्यात तातडीने सुरू झालं मोठं काम

डेल्टा प्लस कोरोनाशी (Delta plus) लढण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

    पुणे, 25 जून : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता डेल्टा प्लसने (Delta plus) टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे (Maharashtra Delta plus)  सर्वाधिक 21 रुग्ण आहेत तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. देशात डेल्टा प्लसने एकूण दोन बळी घेतले आहेत. त्यामुळे आता डेल्टा प्लसचा उद्रेक होऊ नये, यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. महाराष्ट्रात अनलॉकसंबंधी नियमातही आता बदल करण्यात आले आहेत. तर पुण्यात तातडीने एक महत्त्वाचं काम सुरू झालं आहे ते म्हणजे आणखी एका कोरोना लशीचं. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूमध्ये (Serum Institute of India) कोवोवॅक्स (Covovax) लशीचं उत्पादन सुरू झालं आहे. नोवोवॅक्समार्फत (Novavax) तयार करण्यात आलेली कोवोवॅक्स लशीच्या पहिल्या बॅचचं पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूमध्ये उत्पादन सुरू झालं आहे. अशी माहिती कंपनीने दिली होती. हे वाचा - महाराष्ट्रात मॉल्स बंद, थिएटर्सना कुलूप! दुकानं आणि रेस्टॉरंटचं शटर 4 वाजता डाऊन अमेरिकेतील नोवावॅक्स आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट यांचा सप्टेंबर 2020 मध्ये कोरोना लशीबाबत करार झाला होता. NVX-CoV2373 असं या कोरोना लशीचं शास्त्रीय नाव आहे. 14 जूनला नोवावॅक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही लस 90.4 टक्के प्रभावी आहे. तर मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या कोरोना संसर्गापासून ही लस 100 टक्के सुरक्षा देते.  यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लशीचं ट्रायल घेण्यात आलं. ज्यात 29,960 लोक सहभाही झाले होते.  कोरोनाच्या व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्न आणि व्हेरिएंट्स ऑफ इंटरेस्ट यावर ही लस 93 टक्के प्रभावी आहे. डेल्टा प्लसला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे आता या लशीची प्रतीक्षा सर्वांना आहे. हे वाचा - पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात Unlock कठीण भारतात सप्टेंबरमध्ये ही लस लाँच होण्याची आशा आहे, असं सीरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी याआधी सांगितलं होतं. या लशीचं ट्रायल प्रगत टप्प्यात आहे.  CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार भारतात या लशीचं ट्रायल नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण या लशीच्या इतर देशातील ट्रायलच्या आधारे भारतात सीरम इन्स्टिट्यूट त्याआधीच या लशीच्या परवानासाठी अर्ज करू शकते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या