राज्यात डेल्टा प्लसचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जारी केलेले अनलॉकसंबंधी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सनुसार ठराविक टप्पा लागू केला जात असेल तरी ते इतकं सोपं नाही. राज्य सरकारने आता नवे नियम जारी केले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून संबंधित डेटा घेऊन जिल्हा प्रशासनाने कोणत्या लेव्हलमध्ये आपला जिल्हा ठेवावं याचा निर्णय घ्यावा.
पॉझिटिव्ही रेट हा आरटी-पीसीआर टेस्टनुसारच असावा. रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा इतर टेस्टमार्फत धरला जाऊ नये.
पॉझिटिव्ही रेट कमी झाला, ऑक्सिजन बेड्स कमी लागले तर साहजिकच संबंधित जिल्हा खालच्या टप्प्यावर येतो आणि तिथले निर्बंध जास्त शिथील होतील.
पण जरी अशी परिस्थिती असेल तरी खालचा टप्पा लागू करण्यापूर्वी म्हणजे निर्बंध शिथील करण्यापूर्वी किमान दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी आणि या दोन आठवड्यांतील कोरोना प्रकरणांची नोंद घ्यावी त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.
पण जर पॉझिटिव्ही रेट वाढत असेल, कोरोना प्रकरण वाढत असतील आणि नियम अधिक कडक करण्याची गरज असेल तर वरील टप्प्यात जाण्यासाठी दोन आठवडे प्रतीक्षा करण्याची गरज नाही. हा टप्पा तात्काळ लागू करावा.
मॉल, रेस्टॉरंट अशी ठिकाणी, लग्नासारखे समारंभ इथं नियमांचं पालन होतं आहे की नाही यासाठी भरारी पथकं नेमावीत.