मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

BREAKING: शरद पवारांच्या हत्येचा कट, पुण्यात पत्रकाराविरुद्ध तक्रार दाखल

BREAKING: शरद पवारांच्या हत्येचा कट, पुण्यात पत्रकाराविरुद्ध तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे,8 फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि 'पोस्टमन' या पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 'गेले अनेक महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय एैक्याला तडा जातील, अशा अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असं वाटत होतं. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक सातत्याने यू ट्यूब, पोस्टमन पोर्टल, टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, शरद पवारांचा वारकरी परिषदेला टोला पंढरपूरला मी नेहमी जात असतो. मात्र, त्याची प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला लगावला आहे. पंढरपूरला मी नेहमी जात असतो. मात्र, त्याची प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला लगावला आहे. एवढेच नाही तर मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन, माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे. जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार शनिवारी आळंदीत आले होते. पवार म्हणाले, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचे असते. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचे असते. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचे असते, पण यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असाही घणाघाती टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला. सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी सोडायची नसते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.
First published:

Tags: #Pune, Maharashtra news, Murder, Ncp sharad pawar, Pune news

पुढील बातम्या