जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कंपाऊंडरला लोखंडी रॉडने मारहाण; इंजेक्शनसह 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास

पुण्यात कंपाऊंडरला लोखंडी रॉडने मारहाण; इंजेक्शनसह 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास

पुण्यात कंपाऊंडरला लोखंडी रॉडने मारहाण; इंजेक्शनसह 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास

Robbery in Pune: पुण्यातील उंड्री (Undri) परिसरातील इंडस रुग्णालयात (Indus Hospital) मध्यरात्री चार जणांनी प्रवेश करत रुग्णालयावर दरोडा (Robbery) टाकला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 26 जुलै: पुण्यातील उंड्री (Undri) परिसरातील इंडस रुग्णालयात (Indus Hospital) मध्यरात्री चार जणांनी प्रवेश करत रुग्णालयावर दरोडा (Robbery) टाकला आहे. 4 अज्ञात दरोडेखोरांनी रुग्णालयातील कंपाऊंडरला लोखंडी रॉडने मारहाण (Attack with iron rod) करत रुग्णालयातील रोकड आणि इंजेक्शनवर डल्ला (Theft cash with injections) मारला आहे. आरोपींनी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास पायाला दुखापत झाल्याचा बहाणा करत रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण करत 13 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय कंपाऊंडरने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत चार अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास पायाला दुखापत झाल्याचा बहाणा करत संबंधित आरोपींनी रुग्णालयात प्रवेश केला. यानंतर आरोपींनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना काही कळायच्या आत, कंपाऊंडरवर लोखंडी पाइपनं हल्ला केला. तसेच कंपाऊंडरला खुर्ची फेकून मारली. हेही वाचा- Live in पार्टनरने केला घात; 48 दिवसांनंतर स्वीटी पटेलच्या हत्येचं गूढ उलगडलं यानंतर आरोपींनी रुग्णालयाच्या काऊंटरवरून 8 हजार रुपयांची रोकड आणि काही इंजेक्शन असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांना दरोड्याची माहिती मिळेपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. हेही वाचा- 6 वर्षांपासून ‘तो’ एका खोलीत होता बंद; करायचा ‘हे’ संतापजनक काम शनिवारी कंपाऊंडरवर उपचार केल्यानंतर, संबंधित कंपाऊंडरने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चार दरोडेखोरांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण करण्याच्या आणि चोरी, दरोडा अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात