• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • लपायला गेली अन् आयुष्यभरासाठी झाली नजरेआड; लिफ्टच्या दारातून कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी अंत

लपायला गेली अन् आयुष्यभरासाठी झाली नजरेआड; लिफ्टच्या दारातून कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी अंत

मुंबईतील शीव-पूर्व परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका संकुलातील चौथ्या मजल्यावर खेळणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत (7 years old minor girl death) झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 07 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) शीव-पूर्व परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका संकुलातील चौथ्या मजल्यावर खेळणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत (7 years old minor girl) झाला आहे. सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर लपाछपी खेळत असताना सात वर्षीय चिमुकली बंद पडलेल्या लिफ्टमध्ये लपण्यासाठी गेली. पण संबंधित लिफ्टचं दार अचानक उघडल्याने चिमुकली कायमची आई वडिलांच्या नजरेआड गेली आहे. चौथ्या मजल्यावरून कोसळून तिचा हृदयद्रावक मृत्यू झाल आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दिया सिद्धी विनायगम असं मृत पावलेल्या 7 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. ती मुंबईतील शीव पूर्व येथील मासळी बाजाराजवळील ओम शिवशाही सोसायटीतील रहिवासी आहे. संबंधित सोसायटीला दोन लिफ्ट आहेत. पण त्यातील एक लिफ्ट गेल्या दोन वर्षांपासून बंद पडली आहे. दरम्यान मृत दिया ही आपल्या काही चिमुकल्या मित्र मैत्रिणींसोबत लपाछपी खेळत (playing hide and seek) होती. हेही वाचा-पुणे: IAS अधिकाऱ्याच्या घरात दरोडा; लक्ष्मीपूजनात ठेवलेला 43 लाखांचा ऐवज लंपास लपाछपी खेळत असताना मृत दिया ओम शिवाशाही सोसायटीतील लिफ्टच्या दाराजवळ लपण्यासाठी गेली. यावेळी अचानक लिफ्टचं दार उघडलं गेलं आणि ती थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. तिच्यासोबत खेळणाऱ्या अन्य मुलांनी तातडीने याची माझी दियाच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी तातडीने तळमजल्यावर धाव घेत, शेजाऱ्यांच्या मदतीने बंद पडलेल्या लिफ्टचा दरवाजा उघडला असता, याठिकाणी 7 वर्षीय चिमुकली जखमी अवस्थेत आढळली. हेही वाचा-एकच घाव अन् खेळ खल्लास; नालासोपाऱ्यात भाऊबीजेदिवशीच वृद्ध महिलेची निर्घृण हत्या कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने तिला जवळच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी करून उपचारापूर्वीच मृत घोषित केलं आहे. ऐन दिवाळी सणाच्या काळात चिमुकलीचा अशापद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शीव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: