पुणे, 1 ऑगस्ट: विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवत मनुष्यबळ व्यवस्थापकानं (HR) कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत (Lure of marriage) पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे. पण तरुणीनं लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीनं तिला धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर पीडितेनं हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
नीलेश अरविंद मोरे असं गुन्हा दाखल झालेल्या 31 वर्षीय तरुणाचं नाव असून तो सध्या पुण्यातील हडपसर परिसरात वास्तव्याला आहे. पण तो मुळचा बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील रहिवासी आहे. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणीनं हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणी शिक्षण सुरू असतानाच, इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. दरम्यान तिची ओळख आरोपी नीलेश मोरे याच्याशी झाली. आरोपी मोरे हा पुण्यातील एका कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.
हेही वाचा-बहिणीच्या दिरासोबत जुळले प्रेमसंबंध, आईच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
त्यामुळे त्यानं संबंधित कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं पीडितेवर बलात्कार केला आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी पीडितेच्या इच्छाविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित केले आहेत. पण पीडितेनं आरोपीकडे लग्नाची विचारणा केली असता, त्यानं पीडितेसोबत बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. तसेच तिला धमकावण्यासही सुरुवात केली.
हेही वाचा-दादर रेल्वे स्टेशनवर तरुणाचे विकृत चाळे; अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारली अन्...
लग्न झालं असूनही त्यानं अविवाहित असल्याची खोटी माहिती सांगत पीडितेचं लैंगिक शोषण केलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेनं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासोबतच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Rape