मुंबई, 31 जुलै: बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड (Molestation) काढल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण सध्या दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. पण अशा स्थितीतही एका तरुणानं अनोळखी महिलेला घट्ट मिठी (hugged a stranger woman) मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्थानक परिसरातून चालत असताना, अचानक एका अज्ञात युवकानं मिठी मारल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं अचानक येऊन मिठी मारल्यानं संबंधित महिला देखील चक्रावून गेली होती. आरोपीनं मिठी मारल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे स्थानकावर उपस्थित असणारे सहप्रवाशांनी आणि रेल्वे पोलिसांनी आरोपी तरुणाचा पाठलाग करून त्याला पकडलं आहे. याप्रकरणी दादर पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. हेही वाचा- हृदयद्रावक! प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमी युगुलानं उचललं टोकाचं पाऊल सकाळ नं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला कल्याण येथील रहिवासी असून ती मध्य मुंबईत नोकरी करते. पीडित गुरुवारी पावणेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर लोकल पकडण्यासाठी फर्स्ट क्लास डब्याच्या दिशेनं जात होती. दरम्यान, 28 वर्षीय आरोपी युवक संजय यादव पीडितेच्या दिशेनं आला. पीडितेला काही कळायच्या आत आरोपीनं अचानक तिला घट्ट मिठी मारली. या घडलेल्या प्रकारामुळे पीडित महिला गोंधळून गेली होती. हेही वाचा- वाढदिवसाला बोलवून फेसबुकवरील मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत तरुणीवर बलात्कार पण सहप्रवाशी आणि दादर रेल्वे स्थानकावर उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी आरोपी संजय यादवला पकडलं. याप्रकरणी पीडित महिलेनं दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. दादर पोलिसांनी आरोपी संजय यादवला अटक केली आहे. आरोपी तरुण संजय यादव हा वडाळा परिसरातील रहिवासी असून तो एक मजूर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीनं अनोळखी महिलेला मिठी मारून पळ काढण्याचा विकृत प्रकार केल्यानं दादर रेल्वे परिसरात काही काळ महिलांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.