पुणेकरांना झालं तरी काय? कोरोना पीडितांच्या अंत्यसंस्कारास नागरिकांचा विरोध

पुणेकरांना झालं तरी काय? कोरोना पीडितांच्या अंत्यसंस्कारास नागरिकांचा विरोध

या आधीही एका सोसायटीने कोरोनाची भीती घालत एका डॉक्टरला आपला दवाखाना बंद करण्यास भाग पाडलं होतं.

  • Share this:

पुणे 29 एप्रिल: सगळं राज्य कोरोनाविरुद्ध एकत्र येत लढत असताना पुण्यात आज एक संताप वाढविणारी घटना घडली. कोरोना पीडितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास, मृतदेहाला जाळण्यास नागरिकांनी विरोध केला. नायडू हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या स्माशनभूमीचे गेट आसपासच्या नागरिकांनी बंद केलं त्यामुळे स्मशानभूमीच्या गेटवर पीडित नागरिकाचा मृतदेह Ambulanceमध्ये खोळंबून पडला आहे. रात्री उशीरा पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी नागरिकांची समजूत घालण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

या आधीही पुण्यात एका सोसायटीने कोरोनाची भीती घालत एका डॉक्टरला आपला दवाखाना बंद करण्यास भाग पाडलं होतं.  कोरोना बाधित व्यक्ती, त्याचं कुटुंबीय यांना नागरिकांनी किंवा सोसायटीने आदरानेच वागवावे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे, अपमान करणे किंवा अडवणूक करणे यासारखे प्रकार घडले तर शासन कारवाई करू शकते. याबाबत सरकारने आदेशही काढला होता. मात्र असं असतानाही अशा अनेक घटना वारंवार घडताना दिसत आहेत.

दरम्यान, पुण्यात मंगळवारी तब्बल 122 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339वर जाऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यातली संख्या 1491 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात ससूनमध्ये आणखी दोन कोरोना पेशंट्सचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा 79 तर जिल्ह्यातली मृतांची संख्या 83 वर गेली आहे. याशिवाय विविध हॉस्पीटल्समधून तब्बल 73 क्रिटिकल पेशंट्सवर उपचार सुरू आहेत.

यातही समाधानाची बाब म्हणजे तब्बल 24 तासांमध्ये 27 पेशंट्स बरे होऊन घरी परतलेत. त्यात ससूनमधील एका 4 महिन्याच्या बाळाचा आणि 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

हे वाचा -  EXCLUSIVE : ...आणि पुण्यात अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला!

आज राज्यात ३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २५, जळगाव येथील ४ तर पुणे शहरातील २ आहेत. मुंबई शहरात आजचे  मृत्यू हे २० ते २८ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत तसेच जळगाव येथील मृत्यू हे मागील चार दिवसातील आहेत.

हेही वाचा - 

VIDEO पुणे पोलिसांची कमाल! खारीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला काय शिक्षा दिली पाहा

घरी जा म्हणणाऱ्या पोलिसावर उगारलं दांडकं, पिंपरीमधला धक्कादायक प्रकाराचा VIDEO

First published: April 29, 2020, 8:17 PM IST

ताज्या बातम्या