मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Rahul Kalate : तर मी देखील धंगेकरांसारखा विजयी झालो असतो, राहुल कलाटेंनी सांगितली inside story

Rahul Kalate : तर मी देखील धंगेकरांसारखा विजयी झालो असतो, राहुल कलाटेंनी सांगितली inside story

चिंचवडमधून राहिलेले तिसरे उमेदवार राहुल कलाटे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खळबळजणक वक्तव्य केले आहे.

चिंचवडमधून राहिलेले तिसरे उमेदवार राहुल कलाटे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खळबळजणक वक्तव्य केले आहे.

चिंचवडमधून राहिलेले तिसरे उमेदवार राहुल कलाटे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खळबळजणक वक्तव्य केले आहे.

पुणे, 02 मार्च : मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका लागल्या होत्या. यामध्ये अत्यंत चुरशीने कसबा पेठची निवडणूक झाली तर त्याच ताकदीने पिंपरी चिंचवडचीही निवडणूक पार पडली. पिंपरी चिंचवडच्या अश्विनी जगताप तब्बल 35  हजार मतांनी निवडून येत आपला गड अबाधित ठेवला तर कसबा पेठमध्ये रविंद्र धंगेकर यांनी बदल घडवत भाजपची विजयी परंपरा रोखली. दरम्यान चिंचवडमधून राहिलेले तिसरे उमेदवार राहुल कलाटे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खळबळजणक वक्तव्य केले आहे.

राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तब्बल 44 हजारांपेक्षा मताधिक्य घेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर राहुल कलाटे म्हणाले की, मी देखील निवडूण आलो असतो परंतु मला धंगेकरांसारखी महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्यात आली नाही. कलाटे यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्त्यूत्तर दिले आहे.

कसब्यामध्ये नेमकं काय काय घडलं? भाजपला धूळ चारल्यानंतर धंगेकरांनी सगळंच सांगितलं!

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असती तर पुण्यातल्या धंगेकरांसारखा माझा देखील विजय झाला असता. अशी प्रतिक्रिया पराभवानंतर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या टीकेवर राहुल कलाटे यांनी उत्तर देणे मात्र टाळले.

दरम्यान मतमोजणी पार पडल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली तर नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली आहेत. 37व्या फेरीनंतर 36,091 मतांनी जगताप विजयी झाल्याचे घोषीत करण्यात आले.

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. राहुल कलाटे यांनी तब्बल 44 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवल्याने याच मतांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकासआघाडीचा गुलाल, 28 वर्षांनंतर इतिहासाची अशीही पुनरावृत्ती

या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.

First published:
top videos

    Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune Bypoll Election