मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Kasba Bypoll Results : भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकासआघाडीचा गुलाल, 28 वर्षांनंतर इतिहासाची अशीही पुनरावृत्ती

Kasba Bypoll Results : भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकासआघाडीचा गुलाल, 28 वर्षांनंतर इतिहासाची अशीही पुनरावृत्ती

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला आहे.

चंद्रकांत फुंदे आणि वैभव सोनवणे

पुणे, 2 मार्च : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला आहे. भाजपचा गड असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये महाविकासआघाडीने गुलाल उधळला आहे. 28 वर्षानंतर कसबा पेठ मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे, पण 28 वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचा इतिहास घडला होता.

1992 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वसंत थोरात यांनी भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा पराभव केला होता. त्याच राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती धंगेकरांनी भाजपच्या रासनेंचा पराभव करून केली आहे. 1992 च्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसचा विजय झाला होता, त्यानंतर 2023 च्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला विजय मिळाला आहे.

भाजपला धक्का

गेली 28 वर्ष या मतदारसंघात भाजपचा एकछत्री अंमल होता. मात्र पुणेकर मतदारांनी भाजपचे सगळे राजकीय आडाखे धुळीस मिळवले. या पोटनिवडणुकीत भाजपची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली.

खरं तर आजवर हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कारण 1995 पासून या विधानसभा मतदार संघात भाजपचा दबदबा होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही भाजपला विजयाची खात्री होती. मात्र महाविकासआघाडीने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करताचं भाजप सतर्क झालं. जनतेशी दांडगा जनसंपर्क असलेल्या धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळी यंत्रणा कमाला लावली होती. भाजपनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक काळात भाजपचे चार मंत्री पुण्यात तळ ठोकून होते, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. मात्र सुरुवातीपासूनचं या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली होती. उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं, पण मतदारांच्या मनता काही वेगळंचं होतं.

कसबा पोट निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून दुसऱ्यांदा भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीचं झालेल्या शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणुकीत भाजपला नागपूर आणि अमरावती मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, पण सगळी राजकीय यंत्रणा कामाला लावूनही भाजपला हा मतदारसंघ राखता आला नाही.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, Pune