मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अजितदादांनी प्रतिष्ठेची केली, तरी चिंचवडची जागा महाविकासआघाडीने का गमावली? 8 कारणांनी फिरलं चित्र!

अजितदादांनी प्रतिष्ठेची केली, तरी चिंचवडची जागा महाविकासआघाडीने का गमावली? 8 कारणांनी फिरलं चित्र!

बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी चिंचवडची जागा मात्र भाजपने राखली आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे.

बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी चिंचवडची जागा मात्र भाजपने राखली आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे.

बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी चिंचवडची जागा मात्र भाजपने राखली आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pimpri Chinchwad, India

चिंचवड, 2 मार्च : बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी चिंचवडची जागा मात्र भाजपने राखली आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्विनी जगताप यांच्या विजयात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेली मतंही गेम चेंजर ठरली. चिंचवडची ही पोटनिवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती, पण यात महाविकासआघाडीला यश मिळालं नाही.

चिंचवडच्या पराभवाची कारणं

राहुल कलाटेंची बंडखोरी

चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरी भाजपच्या पथ्थ्यावर पडली. राहुल कलाटे यांनी चिंचवडमध्ये 44 हजारांपेक्षा जास्तच मताधिक्य घेतलं, ज्याचा फटका महाविकासआघाडीला बसला.

शेवटच्या टप्प्यात फडणवीस मैदानात

पोटनिवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आणि त्यांनी प्रचाराची सगळी सूत्र हातात घेतली.

शेवटच्या एका तासाने चित्र बदललं

चिंचवडमध्ये शेवटच्या एका तासात 9 टक्के मतदान झालं, हे मतदान भाजपसाठी फायदेशीर ठरलं.

महेश लांडगे ऍक्शनमध्ये

भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांची संपूर्ण सोशल मीडिया टीम आणि बॅक ऑफिस टीम निवडणुकीच्या प्रचारात उतरले.

नगरसेवकांची नाराजी दूर

नाराज झालेल्या नगरसेवकांना समजावण्यात आणि त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यात शहराध्यक्ष लांडगे यांना यश आलं.

महाविकासआघाडीला शेवटच्या टप्प्यात अपयश

चिंचवडमध्ये महाविकासआघाडीने सुरूवातीच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली, पण शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा वेग कायम ठेवण्यात त्यांना अपयश आलं.

मतदार बाहेर आलेच नाहीत

मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढण्यासाठी लागणारी यंत्रणा योग्यरित्या वापरण्यात महाविकासआघाडीला अपयश आलं आहे.

होमग्राऊंडवर काटेंना 'नाना'

नाना काटे यांना त्यांच्या भागातूनही अपेक्षित आघाडी मिळाली नाही. राष्ट्रवादीच्या प्रभावशाली भागातही काटे यांना अपेक्षित आघाडी घेण्यात अपयश आलं.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, BJP, NCP