मराठी बातम्या /बातम्या /पुणे /chinchwad by poll election : चिंचवडमध्ये मविआसमोर मोठा पेच, सेनेच्या बंडोबांमुळे भाजपला होईल फायदा?

chinchwad by poll election : चिंचवडमध्ये मविआसमोर मोठा पेच, सेनेच्या बंडोबांमुळे भाजपला होईल फायदा?


राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पिंपरी चिंचवड, 10 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज निर्णयक दिवस आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पण, चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केल्या गेलेले प्रयत्न अपयशी ठरले आहे. कलाटे हे आपल्या निर्णयावर ठाम आहे, त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा सोडण्यात आली आहे. पण, शिवसेनेकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अर्ज भरला. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे. आज शिवसेनेच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांची मनधरणी केली जाणार आहे, त्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर त्याचबरोबर सुभाष देसाई हे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांची थोड्याच वेळात भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

(थेट दिल्लीतून सूत्र हलली, अन् दाभेकरांनी माघार घेतली, कसब्यात पडद्यामागे मोठ्या घडामोडी!)

तर, काही नेते आपल्याला आमदारकीचं आमिष दाखवत आहेत, परंतु जनता आपल्याला आमदार करेल आणि त्यामुळे आपण निवडणूक लढण्यावर ठाम आहोत. चिन्ह मिळण्याची वाट बघत आहोत, अशी प्रतिक्रिया कलाटे यांनी दिली. तसंच, आपल्यासोबत असलेल्या नेत्यांची फळी बघून अनेकांना धक्का बसणार आहे, असं सांगत कलाटे यांनी नवा ट्विस्ट निर्माण केला.

(Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराला शिवसेनेनं दाखवला 'हात', शिवसैनिक प्रचारातून गायब)

राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक तिरंगी लढत होईल मात्र या तिरंगी लढतीमुळे मतांच विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषकाकडून व्यक्त केला जातंय.

दरम्यान, आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी आज शेवटच्या दिवशी कोण कोण आपले अर्ज माघारी घेत आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

First published:
top videos

    Tags: Pune