चिंचवड, 10 फेब्रुवारी : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नसल्याचे समोर आले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. पण राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. आज शिवसेनेच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांची मनधरणी केली. त्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर त्याचबरोबर सुभाष देसाई हे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांच्याकडे गेले होते. शिवसेनेच्या नेत्यांनी कलाटे यांची भेट घेऊन समजूत काढली. पण, कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही. (काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, नाना पटोलेंनी दिले संकेत, कुणाचा कापणार पत्ता?) कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे. मात्र या तिरंगी लढतीमुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषकाकडून व्यक्त केला जातंय. ( कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं ) चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती एकूण 33 उमेदवार रिंगणात होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणुकीच्या रिंगणात 28 उमेदवार उरले आहे. आता राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे, भाजपकडून अश्विनी जगताप आणि राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये कारमध्ये सापडली 45 लाखांची रोकड दरम्यान , चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाच्या अधिकारीकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये 45 लाख रुपयांची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रक्कम कुठे नेली जात होती. याची चौकशी सुरू आहे. एवढंच नाहीतर आणखी एका कारमध्ये धारदार हत्यार सापडली आहे. संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.