मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातल्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO अंगावर शहारे आणेल; टिळक रस्त्यावर दुचाकीस्वार बसखाली

पुण्यातल्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO अंगावर शहारे आणेल; टिळक रस्त्यावर दुचाकीस्वार बसखाली

वेगाने फरफटत येत असलेला दुचाकीस्वार समोरूव येणाऱ्या बसखाली आला. पुण्याच्या मध्यवर्ती भागात टिळक रस्त्यावर हा अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

पुणे, 3 फेब्रुवारी : पुण्याच्या टिळक रस्त्यावर घडलेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. वेगाने फरफटत येत असलेला दुचाकीस्वार बसच्या समोरच्या भागाखाली जात असल्याचं या दृश्यांमध्ये दिसत आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या अपघाताने खळबळ उडाली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दुचाकीस्वार वेगाने समोरून फरफटत येताना पाहून वेगवान बस थांबली, पण तोवर दुचाकी बसच्या मधल्या भागात अडकल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. रविवारी दुपारी हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

असा झाला अपघात

भरधाव येणाऱ्या दुचाकीची रस्त्यावर समोरच्या बाजूने आलेल्या रिक्षाला धडक बसली. या धडकेने दुचाकीस्वार फरफटत वेगाने पुढे गेला. त्याच वेळी समोरून बस येत होती. या बसखाली तरुण दुचाकीसह फरफटत केला. बसच्या मध्यभागी दुचाकीस्वार अडकला. दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली.

पहिल्यांदा रिक्षाची धडक बसली त्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो फरफटत समोरून येणाऱ्या बसखाली जाऊन अडकला. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. भरदुपारी गजबजलेल्या मध्यवर्ती पुण्यात हा अपघात झाल्याने खळबळ उडाली होती.

" isDesktop="true" id="432963" >

First published:

Tags: Accident, Pune