Home /News /crime /

सैन्यात नोकरीचं अमिष देऊन लुबाडणूक, बोगस सैनिकाला ठोकल्या बेड्या

सैन्यात नोकरीचं अमिष देऊन लुबाडणूक, बोगस सैनिकाला ठोकल्या बेड्या

सैन्यात नोकरी लावून देण्याचं अमिष दाखवून (Police arrested bogus military man) गरजू तरुणांना लुबाडणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    डेहराडून, 6 ऑक्टोबर : सैन्यात नोकरी लावून देण्याचं अमिष दाखवून (Police arrested bogus military man) गरजू तरुणांना लुबाडणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिलिटरी इंजेलिजन्सकडून मिळालेल्या (Military intelligence) माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. असा करायचा फसवणूक राजस्थानच्या हनुमानगडचा रहिवासी असणारा सुनील बाजीगर हा डेहराडूनमध्ये बनावट ओळख दाखवून राहत होता. तरुणांना प्रत्यक्ष आणि ऑनलाईन भेटून तो आपण सैन्यात असल्याचं सांगायचा. सैन्यात नोकरी लावण्यासाठी आपली वरिष्ठांशी ओळख असून त्यांच्या माध्यमातून आपण नोकरी लावू शकतो, असं आश्वासन तो तरुणांना द्यायचा. काही हजारांच्या बदल्यात सैन्यातील नोकरी मिळण्याच्या लालसेनं अनेक तरुण त्याला पैसे द्यायला तयार होत असे. त्यानं स्वतःसाठी मिलिटरीचा युनीफॉर्मदेखील शिवला होता. शिवाय मिलिटरीचं बनावट ओळखपत्रदेखील त्याने तयार करून घेतलं होतं. त्याचप्रमाणं आयकार्ड होल्डर, सैन्याचे बूट आणि बनावट चेकदेखील त्याच्याकडे होते. असा झाला पर्दाफाश एका तरुणाला नोकरी लावण्याचं अमिष देऊन सुनील बाजीगरनं त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तरुणाने ही माहिती सैन्यातील त्याच्या ओळखीच्या काही अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या तरुणाला पकडण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला. सैन्याच्या वेषात भेटीसाठी आलेल्या सुनीलला पोलिसांनी अटक केली. त्याच्या गणवेशावर त्याने सुनील बाजीगर नावाची प्लेटदेखील लावली होती. त्याच्याकडे विचारणा केली असता आपण आयएमएमध्ये मिलिटरी पोलिसांत तैनात असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आयएमएमध्ये फोन करून या बाबीची खातरजमा केली आणि सुनीलचं पितळ उघडं पडलं. हे वाचा - नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर; पहा कुणाला मिळाल्या किती जागा सैन्यात भरती होण्याचं स्वप्न सुनीलचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं, मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्याने अनेक नातेवाईकांना आपण सैन्यात भरती झाल्याची थाप मारली होती. कुणाच्याही नजरेत येऊ नये, यासाठी तो वेगवेगळ्या शहरात नावं बदलून राहत असे आणि तरुणांना फसवून आपला चरितार्थ चालवत असे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Uttarakhand

    पुढील बातम्या