Home /News /pune /

Pune: मित्राला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा एजंट अटकेत

Pune: मित्राला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा एजंट अटकेत

Representative Image

Representative Image

Crime in Pune: पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट (High profile sex racket) चालवणाऱ्या एका एजंटला पुण्याच्या खंडणी विरोधी पथकानं अटक (Agent arrest) केली आहे.

    पुणे, 13 जुलै: पुण्यासह (Pune) राज्यात अनेक ठिकाणी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट (High Profile sex racket) चालवणाऱ्या एका एजंटला पुण्याच्या खंडणी विरोधी पथकानं अटक (Agent arrest) केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला गुजरातमधील  (Gujrat) सुरत याठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपी मागील चार वर्षांपासून फरार होता. पुणे शहरात सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. शिवा एजंट ऊर्फ शिवा रामकुमार चौधरी असं अटक केलेल्या 37 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मुळचा नेपाळमधील रहिवासी आहे. 15 दिवसांपूर्वी तो गुजराजमधील सुरत याठिकाणी आपल्या मित्राला भेटायला आल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना मिळाली होती. या गुप्त माहितीची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची योजना आखली आणि पुणे पोलिसांचं पथक गुजरातला रवाना झालं. हेही वाचा-पुणे: KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शखाली खंडणी विरोधी पथक गुजरातमधील सुरत याठिकाणी गेले होते. येथून सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीनं पुणे पोलिसांनी शिवा चौधरीला अटक केलं आहे. संबंधित आरोपीच्या टोळीनं पुण्यासह राज्यभरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं होतं. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Sex racket

    पुढील बातम्या