भावजीची निर्घृणपणे हत्या करत भावानेच पुसलं बहिणीच्या कपाळावरचं कुंकू

भावजीची निर्घृणपणे हत्या करत भावानेच पुसलं बहिणीच्या कपाळावरचं कुंकू

विष्णूच्या भाऊजीचे गेल्या तीन वर्षांपासून शेजरीच राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे मोहन त्याच्या बहिणीला घटस्फोट देण्यासाठी त्रास देत होता.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड 10 फेब्रुवारी : बहिणीच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंध असल्याच्या संतापातून बहिणीच्या भावनेच आपल्या भावजीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. धक्कादायक म्हणजे हत्या केल्याची माहिती स्वतःच पोलिसांना देत आरोपी भावाने स्वतःला पोलिसांच्या हवाली केलंय. पिंपरी शहरातील भोसरी परिरात ही घटना रविवारी रात्री घडलीय. यात मोहन लेवडे याचा मृत्यू झाला असून हत्या करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णूच्या भाऊजीचे गेल्या तीन वर्षांपासून शेजरीच राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे मोहन त्याच्या बहिणीला घटस्फोट देण्यासाठी त्रास देत होता मुलांना घेऊन तू माहेरी जा असे देखील तो म्हणायचा. हे सर्व बहिनेने आपल्या भावाला सांगितले.

पीडितेचा मृत्यू: 'HYD एन्काउंटर'च्या समर्थनाची वेळ येऊ देऊ नका - मकरंद अनासपूरे

हा वाद मिटावा म्हणून त्याने मोहनला बरच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो समजून घेत नव्हता. रात्री उशिरा घराच्या टेरेसवर दाजी मेहुणे यांनी मद्य पार्टी केली. दोघे ही नशेत तर् होते. तेव्हा देखील मेहुण्याने दाजी मोहन यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात भांडण झाले तेव्हा मेहुण्याने दाजीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

BREAKING अटकेसाठी पूर्व परवानगीची गरज नाही, SC/ST कायद्याच्या दुरुस्तीला मंजुरी

बहिण भावाच्या गळ्याला पडून जोरजोरात रडू लागली. पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या  100 नंबरवर फोन करून आपण दाजीचा खून केल्याची कबुली दिली. थोड्याच वेळात भोसरी पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीला अटक केली आहे.

First published: February 10, 2020, 2:25 PM IST

ताज्या बातम्या