मराठी बातम्या /बातम्या /पुणे /साखरपुड्यानंतर प्रियकराने दिला लग्नास नकार; धक्का पचवू न शकलेल्या प्रेयसीनं उचललं टोकाचं पाऊल

साखरपुड्यानंतर प्रियकराने दिला लग्नास नकार; धक्का पचवू न शकलेल्या प्रेयसीनं उचललं टोकाचं पाऊल

Suicide in Pune: 5 वर्षांपासून प्रेमसंबंधात (Love affair) असणाऱ्या प्रियकराने साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार (Boyfriend refuses to marry after engagement) दिल्यामुळे एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

पुणे, 30 मे: 5 वर्षांपासून प्रेमसंबंधात (Love affair) असणाऱ्या प्रियकराने साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार (Boyfriend refuses to marry after engagement) दिल्यामुळे एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिनं गळफास घेऊन स्वतःला संपवलं (girlfriend commits suicide) आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune) चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीत घडला आहे.

याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी आरोपी तरुणासह त्याच्या घरातील अन्य सदस्यांवर गुन्हा दाखल (FIR) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस  प्रवृत्त केल्याबाबत एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

संबंधित आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय तरुणीचे नाव पुर्णा बंशपती चौधरी असून ती खराडी परिसरातील चंदननगर येथील रहिवासी आहे. तिचं मागील पाच वर्षांपासून आरोपी कपिल मदन गोरे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला होकारही दिला होता. तर काही महिन्यांपूर्वी दोघांचा वाघोली येथील कपिला रिसॉर्टमध्ये साखरपुडाही झाला होता. मात्र, त्यानंतर कपिल हा इतर आरोपींच्या सांगण्यावरून तरुणीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यातूनच या तरुणीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे ही वाचा-Mumbai Crime लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीला प्रियकरानं दगडाने ठेचून मारलं

आत्महत्या करण्यापूर्वी मृत पुर्णाने चिठ्ठी लिहिली असून त्यात तिने आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. पोलिसांनी तरुणीचे वडील बंशपती रामशरण चौधरी यांच्या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कपिल मदन गोरे, मदन गोरे, संगिता मदन गोरे, शुभांगी मदन गोरे, विशाल काळे आणि नरसिंह मुळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. या घटनेचा  पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Marriage, Pune, Suicide