मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Crime लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीची प्रियकरानं केली दगडाने ठेचून हत्या, सार्वजनिक शौचालयात हत्येचा थरार

Mumbai Crime लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीची प्रियकरानं केली दगडाने ठेचून हत्या, सार्वजनिक शौचालयात हत्येचा थरार

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

Murder in Andheri नियाज या 19 वर्षीय तरुणी आणि मृत तरुणीचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळं नियाज वारंवार लग्नासाठी तरुणीकडे मागणी करत होता. पण तरुणी त्याला टाळाटाळ करत होती.

मुंबई, 29 मे : अंधेरी (Andheri) परिसरात प्रियकरानं प्रेयसीचं (Boyfriend killed girlfriend) शौचालयात दगडानं ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरी मेट्रो स्टेशन खालील सिद्धेश्वर महिला संघाच्या शौचालयात पोलिसांना एका अनोळखी महिलेचा मृतदेह (Murder in andheri) आढळला. या महिलेची दगड ठेचून हत्या करण्यात आली होती. एक तरुण आणि तरुणी एकत्र शौचालयात गेले होते. पण काही वेळानं तरुण एकटा बाहेर आला. तरुणी आली नाही म्हणून संबंधित पाहण्यास गेले तर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

(वाचा-घरच्यांचं किती प्रेम आहे पाहण्यासाठी रचली अपहरणाची कथा, मात्र पुढे घडलं भलतंच)

पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिल्यानंतर सर्व प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर या शौचालयकडं येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हत्या झालेली महिला एका तरुणासोबत शौचालय मध्ये येताना पोलिसांना आढळलं. पण तरीही पोलिसांना आरोपीचा शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तरुणीच्या मोबाईलनंबर वरून तांत्रिक तपास करत हत्या करणाऱ्या नियाज अन्सारी याला शोधलं आणि त्याला अटक केली.

(वाचा-प्रेयसी सारखी करायची पैशांची मागणी, पुरवण्यासाठी प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल)

नियाज या 19 वर्षीय तरुणी आणि मृत तरुणीचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळं नियाज वारंवार लग्नासाठी तरुणीकडे मागणी करत होता. पण तरुणी त्याला टाळाटाळ करत होती. त्याच्यासोबत राहायलाही तरुणी टाळत होती. यावरून नियाज आणि या तरुणीमध्ये अनेक वेळा भांडणं झाली होती. त्यांचे वाद-विवाद झाले होते. त्यामुळं नियाजनं कट रचला. त्यानं काही कारणानं प्रेयसीला अंधेरीला आणलं. बराच वेळ दोघांमध्ये गप्पा झाल्या. त्यानंतर दोघेही अंधेरी मेट्रो रेल्वेस्थानका खालील सिद्धेश्वर महिला संघ संचलित शौचालयात गेले. तिथं गेल्यानंतर नियाजनं तरुणीवर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनं दगडानं ठेचून तिची शौचालयातच हत्या केली.

नियाज हत्येनंतर जवळच असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकावर पळत गेला आणि विरारच्या दिशेने जाणारी लोकल पकडून फरार झाला. सायंकाळची वेळ असल्यानं रेल्वेला गर्दी होती. त्याचा फायदा घेत तो फरार होण्यात यशस्वी झाला. पण पोलिसांनी तपास करत नियाजला शोधलं. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता नियाजनं सर्व हकीकत सांगत हत्येची कबुली दिली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai, Mumbai crime branch