मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीकडे जाऊ नये म्हणून बापाने केलं कैद; Video Viral झाल्यानंतर सत्य उघड

पतीकडे जाऊ नये म्हणून बापाने केलं कैद; Video Viral झाल्यानंतर सत्य उघड

सर्वसाधारणपणे आई-वडील लग्नानंतर मुलीची पाठवणी करतात. मात्र येथे स्वत: वडिलचं मुलीला सासरी जाण्यापासून रोखत आहेत.

सर्वसाधारणपणे आई-वडील लग्नानंतर मुलीची पाठवणी करतात. मात्र येथे स्वत: वडिलचं मुलीला सासरी जाण्यापासून रोखत आहेत.

सर्वसाधारणपणे आई-वडील लग्नानंतर मुलीची पाठवणी करतात. मात्र येथे स्वत: वडिलचं मुलीला सासरी जाण्यापासून रोखत आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 28 जून: लग्नानंतर (Marriage) कोणत्याही मुलीला आपल्या नव्या घराचे वेध लागतात. माहेरकडून पाठवणीनंतर मुली सासरी रमतात. माहेरची मंडळीदेखील आनंदाअश्रूंनी मुलीला सासरी पाठवतात. मात्र जर लग्नानंतरही माहेरच्यांनी मुलीला खोलीत डांबून ठेवलं तर? असाच एक प्रकार समोर आला आहे.  मध्य प्रदेशातील पन्ना या भागातून हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे माहेरच्या मंडळीनी मुलीला घरात कैद करून ठेवलं आहे. आणि तिला सासरी जाण्यास मज्जाव आहे. (father imprisoned a daughter)

मुलीने सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हिडीओ अपलोड करून मदतीची मागणी केली आहे. तिने आपल्या घरातील मंडळींवर पतीकडे जाण्यापासून रोखण्याचा आरोप केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील पन्ना येथील आहे. सोशल मीडियावर विवाहित महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने आपल्या घरातील सदस्यांवर आरोप केला आहे. तिने या व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे, तिला घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-Love Letter च्या बदल्यात शिक्षकाची बिनपाण्याने धुलाई; आता अशी झाली अवस्था

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वाती वाजपेयी नावाच्या तरुणीचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती आणि बृजपूर येथील राहुल त्रिवेदी या दोघांचा एकमेकांवर जीव जडला होता. दोघांनी 20 फेब्रुवारी 2020 मध्ये इंदूर येथे लग्न केलं आणि पन्ना येथे परतले. मात्र त्यानंतर मुलगी आपल्या घरी गेली, त्यानंतर माहेरच्या मंडळींनी तिला सासरी जाण्यापासून मज्जाव केला आहे. स्वातीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिला एका खोलीत बंद करून ठेवल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Father, Madhya pradesh, Social media