पुणे, 20 डिसेंबर : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूनं पुण्यात दरवर्षी भीमथडी जत्रा आयोजित केली जाते. अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्त बारामती या संस्थेच्या शारदा महिला संघ विभागाकडून ही जत्रा आयोजित केली जाते. या जत्रेचं यंदा 15 वं वर्ष असून त्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. कधी होणार भीमथडी जत्रा? यावर्षी भीमथडी जत्रा 21 ते 25 डिसेंबर दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित केली जाणार असल्याची मात्रिती आयोजिका सुनंदाताई पवार आणि कुंती पवार यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे या जत्रेतही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत. यावर्षी जत्रेमध्ये भरडधान्याचे (मिलेट-नाचणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई) वेगळे दालन असेल. त्याचबरोबर वैविध्यपूर्ण वस्तूंसह, टाकावू वस्तूपासून टिकाऊ वस्तू , अशी वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना राबवण्यात येणार आहे. यंदाची भीमथडी जत्रा 16 व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, ज्योतिषी, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल,) ग्रामीण खाद्य महोत्सव यासह ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला,उन्हाळी पदार्थ,चटण्या, मसाले,लोणची,कपडे,फळे पालेभाज्या,धान्य,कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. Toilet Seva App : लक्ष्मी रोडवर आला एक वाईट अनुभव आणि तरुणानं सुरु केलं ॲप 23 जिल्ह्यांचा सहभाग राज्यातील 23 जिल्हे,7 राज्यामधून महिला बचत गट व महिला उद्योजिका यांचे 340 स्टॉल यंदाच्या जत्रेत असतील. या भीमथडी जत्रेत महाराष्ट्रातील निवडक उत्पादनांचे दालन, पर्यावरण संवर्धन ही संकल्पना घेऊन देवराई हा उपक्रम, देशी वृक्ष संवर्धन, अशी वेगवेगळी दालनं आहेत. त्याचबरोबर हायड्रोपोनिक्स शेती, मातीविना शेती, विषमुक्त पालेभाज्या, गायीचा गोठा, कुकुटपालन,शेळीपालन,किचन गार्डन, मत्स्यव्यवसाय,पुष्परचना,रेशीम आणि मधुमक्षिका,असे माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल असतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. नगरला मिळते फेमस पापड भाजी, पाहा कसं सुचलं भन्नाट कॉम्बिनेशन अधिक माहितीसाठी संपर्क प्रकल्प अधिकारी मोबाईल क्रमांक - 9822529987 जत्रेची वेबसाईट - www.bhimthadijatra.com
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.