मुंबई 26 डिसेंबर : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलीस तपासाने आता वेगळ्या वळणावर आलाय. या प्रकरणी अनेक अंगांनी पोलीस तपास करत असून नवी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. या तपासात पुणे पोलीस आता थेट अमेरिकेची तपास संस्था असलेल्या FBI (Federal Bureau of Investigation )ची मदत घेणार आहे. या प्रकरणी अटकेत असलेले वरावर राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधला डाटा मिळविण्यासाठी ही मदत घेण्यात येणार आहे. वरावर राव यांच्यावर माओवाद्यी चळवळीला मदत करण्याचा ठपका आहे. पोलिसांनी राव यांच्या घरी छापा घालून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र त्यातून मोठा प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आलाय. तो डेटा मिळविण्यासाठी पोलीस ही मदत घेण्यात येणार आहे. यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान, हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाकरे सरकारला दिलासा, ‘शपथविधी’बाबत राजभवनाकडून आला हा नवा खुलासा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले. ‘कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.
Bhima Koregaon violence case: Pune police to take help of the US based Federal Bureau of Investigation (FBI) to retrieve data from damaged hard disc recovered from Varavara Rao's house, an accused in the case. A team of India's forensic experts&police will soon travel to the USA.
— ANI (@ANI) December 26, 2019
बैठकीला पाटील यांच्यासह पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे; तसेच भीमा कोरेगाव, पेरणे, वढू बुद्रुक आदी गावांतील नागरिक उपस्थित होते. दिल्लीतून उगम पावलेले ‘हे’ ग्रहण कधी सुटणार? धनंजय मुंडेंची खोचक टीका भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार आक्रमक भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर झालेल्या एल्गार परिषदेतील लोकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.