पुणे, 28 जुलै : मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) आपल्या तडाखेबाज भाषणशैली, व्यंगचित्रकार आणि परखड भूमिकेमुळे तरुणाईमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. आज पुण्यात (pune) त्यांच्या एका चिमुरड्या फॅनने चांगलेच इम्प्रेस केल्याचं बघायला मिळालं. या छोट्या फॅनचं नाव आहे सोहम जगताप (soham jagtap). सोहम हा इयत्ता तिसरीत शिकतो. राज ठाकरेंची सही घेण्यासाठी तो समोर आला आणि राज यांनीही त्याचे कौतुक करत आपला ऑटोग्राफ दिला.
त्याचं झालं असं की, राज ठाकरे आज दुपारी मनसे कार्यालयातील शाखाध्यक्षांच्या मुलाखती आटोपून गाडीकडे निघत असतानाच एक चुनचुनीत मुलगा त्यांच्यापाशी आला आणि 'ऑटोग्राफ'साठी हट्ट धरू लागला. विशेष म्हणजे, त्याने सोबत पेन आणि डायरी देखील आणली होती. त्याचा बालहट्ट राज ठाकरे मोडू शकले नाहीत, त्यांनीही मग शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीलाच पॅड बनवले आणि या चिमुरड्याच्या डायरीवर एक शैलीदार सही ठोकली वरून त्याची विचारपूसही केली आणि त्याला हा ऑटोग्राफ जपून ठेवण्यास सांगितले.
सकाळचा भात संध्याकाळी खात असाल तर आधी हे वाचा शिळ्या भाताचे दुष्परिणाम
आता थेट राज साहेबांनीच चिमुरड्याचं कौतुक केलं म्हटल्यावर कार्यकर्तेही साहेबांच्या या छोटा फॅनची आस्थेवाईकपणे चौकशी करू लागले तेव्हा समोरच्याच शाळेतील वॉचमनचा मुलगा असल्याचं कळलं. सोहम जगताप असं त्याचं नाव. शहराध्यक्ष वसंत मोरेंनीही या चिमुरड्याला मनसे कार्यालयात नेऊन चहा बिस्किट खाऊ घातलं. खरंतर राज ठाकरे यांना तरूणाईत खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. अनेकजन त्यांच्या स्टाईलवर फिदा आहेत पण चिमुरडी मुलं देखील राज ठाकरेंच्या प्रेमात असल्याचं पुण्यात बघायला मिळालं. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी देखील या चिमुरड्याचे लाड पुरवल्याने तो जाम खुश होता.
City Of Dreams2 साठी प्रिया बापट सज्ज! पहिल्या सीझनच्या लेस्बियन किसनंतर नव्या..
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, तो ज्यावेळी राज ठाकरेंना भेटायला निघाला त्यावेळी त्याची आई त्याला एकटं सोडत नव्हती म्हणून पठ्ठ्या आईची नजर चुकवून गर्दीत घुसला आणि आपल्या आवडत्या नेत्याला भेटला देखील. हाच उत्साह मनसेला आगामी काळात नक्कीच नवसंजीवनी मिळवून देऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackery