जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सकाळचा भात संध्याकाळी खात असाल तर आधी हे वाचा; शिळ्या भाताचे दुष्परिणाम माहीत नसतील

सकाळचा भात संध्याकाळी खात असाल तर आधी हे वाचा; शिळ्या भाताचे दुष्परिणाम माहीत नसतील

शरीरात फायबर कमी झाल्यामुळे लवकर भूक लागायला लागते. फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. पोट लवकर रिकामं होत नाही. फायबर हळूहळू पचतं. फायबरयुक्त पदार्थ भूक कमी करणारे हार्मोन्स तयार करतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यासाठी फ्लॅक्ससीड, रताळं, संत्र, ड्रायफ्रूट्स आणि भात खावा.

शरीरात फायबर कमी झाल्यामुळे लवकर भूक लागायला लागते. फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. पोट लवकर रिकामं होत नाही. फायबर हळूहळू पचतं. फायबरयुक्त पदार्थ भूक कमी करणारे हार्मोन्स तयार करतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यासाठी फ्लॅक्ससीड, रताळं, संत्र, ड्रायफ्रूट्स आणि भात खावा.

फोडणीचा भात अनेक घरांमध्ये आवडीचा पदार्थ असतो. पण तुमच्या घरात सकाळचा भात संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी खाणं नित्याचं असेल आधी हे वाचा..

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 जुलै : भात (Rice) हा दैनंदिन आहारातील (Diet) महत्वाचा पदार्थ. भरपूर पोषणमूल्य असलेल्या भाताचा आहारात प्राधान्याने समावेश केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वचजण भाताचे सेवन करतात. परंतु, रात्री उरलेला भात सकाळी खाल्ला किंवा सकाळी उरलेला भात रात्री जेवताना खाल्ला तर तो आजारपणाला (Disease) निमंत्रण देणारा ठरतो हे तुम्हाला माहित आहे का? दैनंदिन आहारात शिळे अन्न (Stale Food) वर्ज्य करावे असा सल्ला नेहमीच दिला जातो. परंतु, अन्न वाया जाऊ नये या भूमिकेतून किंवा आवड म्हणून आपण शिळे अन्न खातो. परंतु, शिळा भात खाल्ल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शिळा भात (Stale Rice) खाल्ल्याने कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, तसंच जर तुम्ही शिळा भात खाणार असाल तर त्यावर काय प्रक्रिया करावी, जाणून घेऊया याविषयी… शिळा भात खाल्ल्यानं आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो याबाबतच सविस्तर वृत्त टीव्ही 9 हिंदीनं दिलं आहे. खरंतर भात शिजवल्यावर नंतर तो एक ते दोन तासांत खाणं श्रेयस्कर आहे. जर तुम्हाला शिजवल्यानंतर लगेच भात खाणं शक्य नसेल तर तो योग्य ठिकाणी आणि योग्य तापमानात म्हणजेच रुम टेम्प्रेचर मध्ये न ठेवता फ्रिजमध्ये ठेवावा. परंतु, फ्रिजमध्ये ठेवलेला भात तुम्ही काही तासांतच खावा. तो दुसऱ्या दिवशी खाऊ नये. फ्रिजमध्ये ठेवलेला भात जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाल्ला तर तो शरीरासाठी अपायकारक असतो. तसेच फ्रिजमध्ये (Fridge) ठेवलेला भात तुम्ही एकदाच गरम करुन खा. कारण वारंवार गरम केल्यास असा भात देखील नुकसानदायक ठरु शकतो. फळ खाताना करू नका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार शिळा भात खाणं खरं तर आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असतं, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. शिळा भात खाल्ल्याने फूड पॉयझनिंग (Food Poisoning) होऊ शकतं. शिळा भात खाणं आरोग्याच्या दृष्टीनं हितावह नाही, असं इंग्लडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीच्या आधारे इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. कोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको! 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर कच्च्या तांदळात जीवाणू असतात. तुम्ही तांदुळ शिजवून भात केला तरी त्यात या जीवाणूंचे अस्तित्व कायम राहतं. मात्र हे जीवाणू शरीराला अपायकारक नसतात. परंतु, भात शिजवल्यानंतर बराच काळ रुम टेम्प्रेचरमध्ये (Room Temperature) ठेवला तर या जीवाणूंचे रूपांतर बुरशीत होते. त्यामुळे तुम्ही जर असा भात खाल्ला तर फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे भात रुम टेम्प्रेचरमध्ये बराच काळ न ठेवता तो लवकर कसा संपेल हे पाहावे, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात