पुणे, 9 मार्च : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.सोनसाखळी चोरांनी देखील शहरात धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसाला पाच ते सहा अशा घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. अशाचप्रकारची घटना शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र दहा वर्षाच्या चिमुकलीने या चोराला असा काही धडा शिकवला की त्यामुळे चोरट्याला खाली हात परतावे लागले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नेमकं काय घडलं? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 60 वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच असलेल्या 10 वर्षाच्या नातीने चोरट्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडला आहे. ऋत्वी घाग असे या चिमुरडीचे नाव असून तिच्या या धाडसी कृत्याचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 60 वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच असलेल्या 10 वर्षाच्या नातीने चोरट्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडला #news18lokmat #marathinews #CCTV pic.twitter.com/6JSEgKdzPN
— News18Lokmat (@News18lokmat) March 9, 2023
नातीने शिकवला धडा मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या लता घाग या आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी 25 ते 30 वयाचा एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या आजीला पत्ता विचारला. आजी पत्ता सांगत असतानाच चोरट्याने आजूबाजूला पाहत डाव साधत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या चिमुरडीने थेट चोरट्यावर हल्लाबोल केल्यानं त्याचा डाव फसला आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

)







