**पुणे,20 फेब्रुवारी:**दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील पुरंदर येथे छापा टाकून मेफेड्रोनची (अंमली पदार्थ) फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. एटीएसच्या जुहू युनिटने कंपनीच्या गोदामातून सुमारे 200 किलो (अंदाजे किंमत 5 कोटी 60 लाख 60 हजार) एमडी बनवण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. महेंद्र परशुराम पाटील (वय-49) आणि संतोष बाळासाहेब आडखे (वय-29) अशी आरोपींची नावे आहेत. मोदी-शहांमध्ये विकृत मानसिकता, कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची सडकून टीका याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील दिवे येथील संतोष आडखे यांच्या श्री अल्फा केमिकल्स येथे एमडी बनवण्याची फॅक्टरी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर एटीएसच्या जुहू पथकाने छापा टाकून एमटी ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त केली. आरोपीने दिलेल्या माहितीवरून एटीएसने पुण्यातील जाधववाडी आणि मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील गोदामातून सुमारे 14 किलो 300 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. या ड्रग्सची किंमत 5 कोटी 60 लाख 60 हजार एवढी आहे. तसेच एटीएस पथकाने 1 कोटी 25 लाख रुपयांचा कच्चा माल जप्त केला आहे. जप्त केलेल्या कच्च्या मालापासून सुमारे 80 कोटी रुपयांचे 200 किलो एमडी ड्रग्स बनवला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. चिनी ‘कोरोना’चा महाराष्ट्राला फटका, तब्बल 150 कोटींचं नुकसान एटीएसने दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गंत कलम 22, 29 सह भादंवि कलम 8 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.