जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिनी 'कोरोना'चा महाराष्ट्राला फटका, तब्बल 150 कोटींचं नुकसान

चिनी 'कोरोना'चा महाराष्ट्राला फटका, तब्बल 150 कोटींचं नुकसान

फ्राईड लेग चिकन पीस
दुर्गम भागात सैनिकांना चांगलं जेवण मिळणं कठीण असतं. त्यांच्यापर्यंत जेवण पोहचायला वेळ लागतो. अशावेळी डीएफआरएलने बनवलेले खाद्यपदार्थ बराच काळ टिकतात. फ्राइड लेग पीस हा पदार्थ खास यासाठीच तयार करण्यात आला आहे.  हा पाकीटातून काढल्यानंतर गरम करुन खाता येतो.

फ्राईड लेग चिकन पीस दुर्गम भागात सैनिकांना चांगलं जेवण मिळणं कठीण असतं. त्यांच्यापर्यंत जेवण पोहचायला वेळ लागतो. अशावेळी डीएफआरएलने बनवलेले खाद्यपदार्थ बराच काळ टिकतात. फ्राइड लेग पीस हा पदार्थ खास यासाठीच तयार करण्यात आला आहे. हा पाकीटातून काढल्यानंतर गरम करुन खाता येतो.

चिकन (Chicken) खाल्ल्यामुळे कोरोनाव्हायरस (coronavirus) होतो, या अफवेमुळे राज्यातील पोल्ट्री फार्म (poultry farm) उत्पादकांचं नुकसान झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : चिनी कोरोनाव्हायरसचा (China coronavirus) महाराष्ट्राला (Maharashtra) मोठा फटका बसला आहे.  चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाव्हायरस होतो, अशी अफवा पसरली आणि त्याची धास्ती घेऊन सर्वांनीच चिकनकडे पाठ फिरवली. परिणामी पोल्ट्री फार्म उत्पादकांचं तब्बल 150 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने पत्रकार परिषदेत दिली. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीपर्यंत चिकनचा विक्री दर ठीक होता. मात्र चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो अशी अफवा 4 फेब्रुवारीला पसरली आणि त्यामुळे चिकनचा खप कोसळला. हा खप 3,500 मेट्रिक टनवरून 2000 मेट्रिक टन म्हणजे तब्बल 20 लाख किलोवर आला. यामुळे तब्बल 150 करोडचं नुकसान झालं आहे. अंडे विक्रीवर मात्र काहीही परिणाम झालेला नाही. हेदेखील वाचा -  चिकन खाल्यामुळे कोरोनो होतो अशी अफवा पसरवून फसले, राज्य सरकारने दिला झटका चिकन खाल्यामुळे कोरोनोव्हायरस होतो या अफवेविरोधात राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल केला आहे. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म उत्पादकांचं नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. राज्यात एकूण 7 कोटी 42 लाख कुक्कुट पक्षी आहेत, तर ६० टक्के मांसाहारी लोक आहेत. आता हा खप 2,400 मेट्रिक टनपर्यंत वाढला आहे, असं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं. हेदेखील वाचा -  Fact Check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का? चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ‘चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका’, असं पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं. जर कोणालाही काहीही शंका असतील तर पशुपालन विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात