मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? रोहित पवारांच्या कार्यक्रमाला मारली दांडी

अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? रोहित पवारांच्या कार्यक्रमाला मारली दांडी

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आज सकाळपासून आमदार रोहित पवार आत्मक्लेशसाठी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आज सकाळपासून आमदार रोहित पवार आत्मक्लेशसाठी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आज सकाळपासून आमदार रोहित पवार आत्मक्लेशसाठी उपस्थित होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

जुन्नर, 03 डिसेंबर : मागील काही दिवसांपासून शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे सातत्याने मतदारसंघात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अनुपस्थित असतात. त्यात आजही ते त्यांच्याच शिरुर लोकसभा मतदारसंघात असलेल्या वढू बुद्रुक येथील रोहित पवारांच्या आत्मक्लेश कार्यक्रमासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आज सकाळपासून आमदार रोहित पवार आत्मक्लेशसाठी उपस्थित होते. स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. मात्र यात स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे मात्र दिसत नव्हते. यावर माध्यमांनी विचारल्यावर रोहित पवार यांनी सारवासारव केली.

(बेळगावसाठी गुवाहाटीला का नवस मागायला जात नाही? उद्धव ठाकरेंचा शिंदेंना सणसणीत टोला)

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात मालिका आणि चित्रपट काढणारे डॉ कोल्हे याच विषयाच्या अनुषंगाने असलेल्या आणि भाजप नेत्यांच्या विरोधात असलेल्या आत्मक्लेशला उपस्थित न राहिल्याने अनेकांना प्रश्न पडला. मात्र तब्येतीचं कारण देत नेत्यांनी कोल्हे यांची सारवासारव केली.

('यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा', उदयनराजेंचा रायगडावरून थेट इशारा)

काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील चिंतन शिबिरातली कोल्हे यांची अनुपस्थिती होते. त्यानंतर गुजरात निवडणूक प्रचार यादीतून कोल्हे यांचं नाव गायब झाल्याने कोल्हे भाजपच्या वाटेवर अशा आशयाच्या बातम्या पुढे आल्या होत्या. त्यातच आज डॉ कोल्हे यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीची चर्चा होऊन चर्चेत राहिली. त्यामुळे कोल्हे यांच्या मनात नेमकं काय हे मात्र अनुत्तरीतच आहे.

First published: