मुंबई, 03 डिसेंबर : 'कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आणि आमचा मुख्यमंत्री गुवाहाटीवरून येत आहे, आता गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला जात का नाही. सगळ्या आमदार, मंत्र्यांना घेऊन गुवाहाटीला गेलं पाहिजे, तिकडे जाऊन बेळगाव जर पदरात पडत असेल तर सगळे प्रश्न नवस करून फेडले पाहिजे. कर्नाटकने आपल्या धरणात पाणी सोडलं आहे, पण यांचा हा नेंभळटपणा कायम आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असेल आणि आमचा मुख्यमंत्री गुवाहाटीवरून येत आहे, आता गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला जात का नाही. सगळ्या आमदार, मंत्र्यांना घेऊन गुवाहाटीला गेलं पाहिजे, तिकडे जाऊन बेळगाव जर पदरात पडत असेल तर सगळे प्रश्न नवस करून फेडले पाहिजे. कर्नाटकने आपल्या धरणात पाणी सोडलं आहे, पण यांचा हा नेंभळटपणा कायम आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
('यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा', उदयनराजेंचा रायगडावरून थेट इशारा)
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत 17 तारखेला बैठक झाली आहे. आम्ही पुन्हा एकदासोबत येणार आहोत. महाराष्ट्र प्रेमी आणि छत्रपती प्रेमी एकत्र येत आहे. केवळ महाराष्ट्र बंद करून थांबणार नाही, आगामी काळामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्याची गरज आहे. कारण, असे मिंधे सरकार, लाचार सरकार दिल्लीश्वरांची खुर्चीसाठी पाय चाटत असेल तर त्याची अपेक्षा न केलेली बरी, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
'राज्यपाल हे केवळ राज्यपाल नसून ते राष्ट्रपतीचे दूत मानले जातात. जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या आयुक्ताबद्दल सुनावणी सुरू आहे. तसं राज्यपाल नियुक्तीबद्दल निकष ठरवले पाहिजे. कारण, मी कुणी तरी झालो आणि राज्यपाल म्हणून पाठवलं, असं चालणारनाही. केवळ माझा माणूस म्हणून तो बिनडोक असला तरी चालेल पण राज्यपाल म्हणून पाठवलेलं चालणार नाही' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत केंद्र सरकारला सुनावलं.
'उदयनराजे यांचे खास आभार मानतो. भाजपमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी नाराज असून ते एकत्र येत आहे. थोडा अवधी दिला होता, राज्यपाल बदलले जात असेल तर चांगलं आहे पण त्यांना पाठिंबा दिला जात आहे. अगदी आताच्या महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेसोबत केली जात असेल तर महाराष्ट्र काय आहे, तो दाखवून देण्याची वेळ आली आहे. ते आम्ही करणार आहोत, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
('आज देश या विकृत लोकांच्या तावडीत गेला', उदयनराजे थेट बोलले)
' मी मुख्यमंत्री असताना पद सोडत असताना अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार अशी घोषणा केली होती. आता त्या घोषणेला सुद्धा या लोकांनी स्थगिती दिली असेल तर कल्पना नाही. प्रत्येक राज्यामध्ये इतर राज्याचे भवन असतात पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचं आणि कर्नाटकचं नात काय आहे, याबद्दल अजूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलं नाही. कारण मुंबईमध्ये भवन बांधत असतील तर राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. आपल्या सरकारकडून आणि मुख्यमंत्री शिंदेंकडून साधा ब्र सुद्धा काढला गेला नाही' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी आहे. त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. ते सगळे आमच्यासोबत येणार आहे. त्यानुसार कार्यक्रम ठरवला जाणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
'आम्ही कुठेही आपमतलबीपणा केला नाही, आपल्या स्वार्थासाठी निर्णय घेतले नाही. मी सत्ता सोडल्यानंतर पालिका आणि प्रशासकीय कार्यालयात काय काम चाललंय हे मला माहिती नाही. आमच्या काळात निक्षारकरणाचा प्रकल्प सुरू केला होता, मुंबई करांसाठी हा मोठा प्रकल्प होता. पायलट प्रोजेक्ट सुरू झाला होता. 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला असता. त्यामुळे पावसावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नसती. आरेमध्ये कारशेड उभारण्याची गरज नव्हती. कांजुरमार्गच्या ओसाड जागेत हा प्रकल्प झाला असता. पण प्रतिष्ठेचा मुद्दा केला, पर्यावरणाची हाणी झाली तरी चालेल, पण इगो कमी होता कामा नये, असं या सरकारने केलं आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.