जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील काँग्रेस नेत्याविरोधात हिंसाचाराचा आरोप, सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेस नेत्याविरोधात हिंसाचाराचा आरोप, सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेस नेत्याविरोधात हिंसाचाराचा आरोप, सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

2009 साली लग्न झाल्यानंतर शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचा आरोप सुनेने केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 9 मे : माजी मंत्री आणि कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या सह पत्नी आणि मुलावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणचा गुन्हा वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. शिवरकर यांचे चिरंजीव अभिजीत शिवरकर यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसात कलम 323/504/506/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीतने पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करत हाकलुन देण्याची धमकावले असा आरोप करण्यात आला आहे. शिरवरकर यांची सून स्नेहा शिवरकर (वय 36) यांनी केलेल्या तक्रारीनुसार पतीच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारल्यामुळे शिवरकर कुटुंबीयांनी आपला शारिरीक व मानसिक छळ केल्याचं म्हटलं आहे. या तक्रारीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे ही वाचा- पुण्यात 14 महिन्यात 4लाख जणांनी कोरोनाला हरवलं, रुग्ण बरं होणाऱ्याचं वाढलं स्नेहा या डॉक्टर असून त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. 2009 मध्ये त्यांचं अभिजित शिवरकर यांच्यासोबत लग्न झालं होतं. तेव्हा पासूनच घरात शिवीगाळ व मारहाण सुरू असल्याचा दावा स्नेहाने केला आहे. मधुमेही असल्याच्या कारणावरुनही तिला बोलणे ऐकावे लागत असल्याचे स्नेहा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात