• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यातून दिलासादायक बातमी! 14 महिन्यात 4 लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं, बाधितांपेक्षा बरं होणाऱ्याचं प्रमाण वाढलं

पुण्यातून दिलासादायक बातमी! 14 महिन्यात 4 लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं, बाधितांपेक्षा बरं होणाऱ्याचं प्रमाण वाढलं

Corona cases in Pune: राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होत असताना, दुसरीकडे मृत्यूचं (Corona deaths) प्रमाणही वाढलं आहे. अशात कोरोना विषाणूशी निकरानं लढणाऱ्या पुण्यात सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

 • Share this:
  पुणे, 09 मे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगानं वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होत असताना, दुसरीकडे मृत्यूचं (Corona deaths) प्रमाणही वाढलं आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूशी निकरानं लढणाऱ्या पुण्यात सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. काल शनिवारी पुणे शहरात कोरोना बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. पुण्यात शनिवारी 4  हजार 73 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मागील 14 महिन्यांत कोरोनातून ठणठणीत बरं होऊन घरी परतणाऱ्या पुणेकरांची संख्या 4 लाखावर गेली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं पुण्यात कोरोना चाचण्या घेण्याचं प्रमाणही वाढवण्यात आलं आहे. शनिवारी (8 मे) पुण्यात एकूण 17 हजार 118 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील 2 हजार 837 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कालच्या आकडेवारीनंतर पुण्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 4 लाख 45 हजार 539 वर पोहोचली आहे. असं असलं तरी पुण्यात सक्रीय रुग्णसंख्या झपाट्यानं घटत आहे. सध्या पुण्यात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 36 हजार 586 एवढी आहे. हे वाचा-Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर... मागील चोवीस तासांत पुण्यात एकूण 59 रुग्ण दगावले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत एकूण 7 हजार 304 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतचं राज्यातही कोरोना विषाणू नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. मागील चोवीस तासात राज्यात एकूण 53 हजार 605 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 82 हजार 266 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण 86.03 टक्के एवढं आहे. हे वाचा-आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात कोरोना रुग्णांची लूट! HRCTसाठी दुप्पट भाव गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांचा आकडा घटताना दिसत आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असला तरी, बहुतांशी लसीकरण केंद्रावर लशीचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात लशीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्यानं अनेक अडचणी येत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: