पुणे, 21 फेब्रुवारी: आळंदीमध्ये 7 वर्षीय विद्यार्थ्याला महाराजाकडून बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजाने या मुलाली इतकी बेदम मारहाण केली की त्याची 4 दिवसांपासून शुद्धच हरपली आहे. भयानक बाब म्हणजे मारहाण करणारा महाराज सध्या फरार असून पोलीसही महाराजांविरोधात तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे.
हरीपाठाचं पाठांतर न केल्यानं महाराजाने 7 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आळंदी इथल्या आश्रम शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला.या मारहाणीनंतर मुलाची प्रकृती 7 दिवस गंभीर होती. अध्यात्मिक शिक्षणात असलेला अभ्यास पूर्ण न केल्याने भगवान पोव्हणे महाराजाने विद्यार्थ्याला काठीनं बेदम मारहाण केली. डोके छाती आणि पोट आदी अवयवांवर जबरदस्त मार लागल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
4 दिवसांपासून या पीडित मुलाची शुद्ध हरपली आहे. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला हाताला आणि पायाला बेदम मार लागल्यामुळे सूज आली आहे. हरी पाठाचं पाठांतर न केल्यामुळे मुलाला काठीनं बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईनं केला आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या भगवान पोव्हाणे महाराजाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पीडित मुलाचे पालक गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
हेही वाचा-ATSने पुण्यात असा रचला सापळा, एमडी ड्रग्सची फॅक्टरी केली उद्ध्वस्त
हेही वाचा-भाजपच्या माजी आमदाराचे पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची 'लश्कर-ए-तोयबा'ची धमकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aalandi, Pune crime, Pune news