Home /News /maharashtra /

भाजपच्या माजी आमदाराचे पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची 'लश्कर-ए-तोयबा'ची धमकी

भाजपच्या माजी आमदाराचे पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची 'लश्कर-ए-तोयबा'ची धमकी

'लश्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेने भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे मिरारोड येथील पंचतारांकित हॉटेल सेव्हन इलेव्हन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे

    मुंबई, 19 फेब्रुवारी:'लश्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेने भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे मिरारोड येथील पंचतारांकित हॉटेल सेव्हन इलेव्हन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. 'लश्कर-ए-तोयबा'ने हॉटेलच्या अधिकृत मेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला आहे. '24 तासांच्या आत 7 कोटी रुपये खात्यावर जमा करा', असेही ईमेलद्वारे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी ठाणे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम मंदिराप्रमाणे बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन करावं, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत चार प्रसिद्ध हॉटेल्स बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यात लीला हॉटेल, सहारा स्टार, सी प्रिंसेस आणि दी पार्क हॉटेलचा समावेश आहे. फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे हॉटेल सेव्हन इलेव्हनला बुधवारी सकाळी 'लश्कर ए तोयबा'ने मेल पाठवून धमकी दिली. खुद्द माजी आमदार मेहता यांनी ही माहिती पोलिसांना दिली. धमकी देणाऱ्यांनी सात कोटींची मागणी केली असून 24 तासांच्या आत पूर्ण रक्कम खात्यावर जमा केली नाही; तर बॉम्बस्फोट घडवून आणू. यासाठी आम्ही शहीद व्हायला तयार आहोत. असा उल्लेख धमकीच्या मेलमध्ये आहे. नोकरदारांनो, पगारवाढीची अपेक्षा नकोच! यंदा Salary hike असू शकते सर्वांत कमी पोलिसांनी याबाबत तातडीने दखल घेतली असून संपूर्ण हॉटेल रिकामे केले आहे. हॉटेलची कसून झाडाझडती घेतली जात आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. हॉटेलचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून तपासणी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक शांताराम वळवी यांनी दिली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Mumbai police

    पुढील बातम्या