पुणे, 16 जून : गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेलं पुणे शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सर्व दुकानं आणि बाजारापेठा सुरू करण्यात आल्या आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कंटेन्मेंट परिसरातील दुकानांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील कंटेंनमेंट परिसरातील 90 टक्के दुकाने उघडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंटेन्मेंट झोनमधील दुकानं उघडण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनेकडून होत होती. याबाबत आज अजित पवार यांनी पोलीस, महापालिका आयुक्त आणि व्यापारी महासंघाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये सुद्धा 90 टक्के दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोनची होणार पुर्नरचना दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाउनच्या काळात ज्या भागात जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. आता पुण्यात जो भाग आधी ग्रीन झोनमध्ये होता तिथेही रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नव्याने त्या परिसराची रचना करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली होती. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.