जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / दादा vs दादा! '...ती भाषा आम्हालाही लय चांगली जमती', अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

दादा vs दादा! '...ती भाषा आम्हालाही लय चांगली जमती', अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

दादा vs दादा! '...ती भाषा आम्हालाही लय चांगली जमती', अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

  • -MIN READ Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

बारामती, 10 डिसेंबर : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सारखं काही ना काही चुकीचं बोलतात, महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कोणी सांगितलं तुम्हाला भीक मागितली म्हणून? आम्ही जर भिकारड्यासारखं बोलतो, असं म्हटलं तर काय वाटेल तुम्हाला? पण आम्ही असं बोलणार नाही,’ असं टीकास्त्र अजित पवारांनी सोडलं. ‘आरे ला कारे आम्हालाही करता येतं, भ ची भाषा तर आम्हाला लय चांगली जमती. कोण भिकेला लागतंय, हे चंद्रकांत पाटलांना दाखवायची वेळ आली आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

जाहिरात

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला करणारे समता सैनिक दल संघटनेचे कार्यकर्ते आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. समता सैनिक दल संघटनेच्या मनोज गरबडे आणि विजय ओहाळ या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हल्ला प्रिप्लॅन, शाई कुणी फेकली? चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात