अजित पवारांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा, आता येणार नवे नियम

अजित पवारांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा, आता येणार नवे नियम

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज रविवारी पुण्यात (Corona in Pune) आढावा बैठक घेतली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

पुणे 21 फेब्रुवारी : कोरोना रुग्णांची (Corona virus) वाढती संख्या पाहून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज रविवारी पुण्यात (Corona in Pune) आढावा बैठक घेतली. पुणे जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना रूग्णवाढीचा आकडा शनिवारी पुन्हा हजारावर गेल्याने चिंतेचं वातावरण आहे. अशात सकाळी नऊ वाजता घेण्यात आलेल्या बैठकीत पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) असलेल्या भागात प्रभावीपणे उपाययोजना आणि अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण तसंच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक करण्याचं यावेळी सांगण्यात आलं.

यासोबतच संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) अधिक प्रभावीपणे राबविण्याचं धोरण यावेळी ठरवण्यात आलं. सोबतच नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलं. शनिवारी दिवसभरात पुण्यात 414 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी 6 रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर, 160 जणांची प्रकृचती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुण्यातील आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Pune) 197330 इतकी असून यातील 4 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत 189948 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या 2 हजार 561 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: February 21, 2021, 10:12 AM IST

ताज्या बातम्या