Home /News /pune /

Ajit pawar : शरद पवार, नितीन गडकरींच्या नंतर आता अजित पवार म्हणतात ऊस शेतीला पर्याय शोधा

Ajit pawar : शरद पवार, नितीन गडकरींच्या नंतर आता अजित पवार म्हणतात ऊस शेतीला पर्याय शोधा

उसाला पाणी (sugarcane farming) अधिक लागत असल्याने त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

    पुणे, 06 मे : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषि निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिले. ऊसाला पाणी (sugarcane famring) अधिक लागत असल्याने त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज आहे. असे विधानभवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पवार म्हणाले. यापुर्वी खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी ऊस हे आळशी लोकांचे पीक बनले आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनीही असेच वक्तव्य केले होते. ते पुढे म्हणाले की, कृषि विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्याने  गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. शेतात उभ्या असलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि एकरी तोटा भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येत असल्याचे ही पवार म्हणाले.  हे ही वाचा : मनसे नेते संदीप देशपांडेंवर अटकेची टांगती तलवार; कार ड्रायव्हर अटकेत पुणे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बोटे यांनी 2022-23 च्या खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात मुख्य पिकाखालील खरीप हंगामासाठी 2 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. एकूण 26 हजार 676 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून 15 हजार 125 क्विंटल उपलब्ध झाले आहे. तर खतांचे 2 लाख 15 हजार 122 टन आवक असून 74 हजार 386 टन खते उपलब्ध आहेत. यावर्षी 4 लाख 10 हजार 72 खातेदारांना 4 हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन असून 1047 कोटींचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चालू वर्षी सर्व 1922 गावांचा ग्रामस्तरीय कृषि आराखडा तयार करण्यात आला आहे. 7 हजार हेक्टर क्षेत्रावर चार सूत्री भात लागवड करण्यात येणार आहे. हुमणी नियंत्रण अभियान अंतर्गत 10 हजार सापळे लावण्यात येणार आहे. 60 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पाचट अभियान राबविण्यात येणार आहे. 2050 हेक्टरवर कोरडवाहू फळबाग लागवड करण्यात येणार असून 10 हजार विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. काय म्हणाले शरद पवार? 'ऊस हे आळश्याचं पीक आहे. रान तयार केलं, पाण्याची व्यवस्था केली की मग काहीच चिंता करायची गरज नाही. त्यानंतर त्याठिकाणी कोणी ढुंकूनही बघत नाही. गडी मोकळा होतो. गावाच्या चावडीवर जातो आणि पंतप्रधान मोदींपासून ते गावात काय चाललंय याची चर्चा करत बसतो. ही अवस्था सध्या आमच्या ऊस वाल्यांची आहे', असे पवार म्हणाले होते.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Ajit pawar, Farmer, Pune ajit pawar, Sugarcane farmer

    पुढील बातम्या