मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मनसे नेते संदीप देशपांडेंवर अटकेची टांगती तलवार; कार ड्रायव्हर अटकेत

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अटकेची टांगती तलवार; कार ड्रायव्हर अटकेत

कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी संदीप देशपांडेवर (Sandeep Deshpande) दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी अपडेट समोर आली आहे.

मुंबई, 06 मे: मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे 4 तारखेला ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केलं होतं. पण, मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) कारमधून पळून गेले होते. यावेळी कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी संदीप देशपांडेवर दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी अपडेट समोर आली आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी ज्या ड्रायव्हरने चालवली होती त्याला अटक करण्यात आली आहे.

शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस दोघांचा शोध घेत आहे. आता संदीप देशपांडे निसटून जात असताना त्यांची कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.

देशपांडे आणि धुरी इनोव्हा गाडीतून पळाले मात्र शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतच उतरले आणि गाडी बदलून पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शिवाजी पार्क पोलिसाबरोबरच गुन्हे शाखेच्या विविध पथकाकडून त्यांचा शोध सुरु आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघा जणांना अटक झाली आहे. दादर शाखाप्रमुख संतोष माळी आणि इनोव्हा गाडी चालवणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी आधीच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. मुंबईतही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे कारमधून बसून पळून गेले.

यावेळी भरधाव वेगात कार दामटल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. महिला कर्मचारी खाली पडल्यानंतरही संदीप देशपांडे यांनी कार न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician), Sandeep deshpande