जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / ..तेव्हा शरद पवारांनीच फडणवीसांना राजभवनावर 'बोलावलं', पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

..तेव्हा शरद पवारांनीच फडणवीसांना राजभवनावर 'बोलावलं', पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

'अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?

'अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?

‘अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 22 फेब्रुवारी : राज्याच्या राजकारणामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. पहाटेच्या शपथविधी हा घडवून आणला होता, असा खुलासा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर आज पवार यावर बोलले आहे.

आता ‘अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजेन वाले को इशारा काही है, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती. जयंत पाटील काय म्हणाले? (Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं पारडं जड, सरन्यायाधीश अखेर स्पष्टच बोलले) जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते. अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली त्याला फार महत्त्व आहे, असे मला वाटत नाही. (राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हाच फरक, प्रणिती शिंदेंनी उदाहरणासहच सांगितलं) अजित पवार काय म्हणाले? पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांची खेळी होती अश्या चर्चा सुरू आहेत. पण, या चर्चा महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्या संपूर्ण प्रकरणानंतर मी माध्यमांना त्या विषयाबद्दल कधीच बोलणार नाही हे तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. बराच काळ झाला. आता त्या विषयाला महत्व नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात