मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हाच फरक, प्रणिती शिंदेंनी उदाहरणासहच सांगितलं

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हाच फरक, प्रणिती शिंदेंनी उदाहरणासहच सांगितलं

सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 22 फेब्रुवारी : माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात त्यांच्या जवळ जातात. त्या महिला यांच्याकडे भाऊ म्हणून बघतात. आमचे नेते राजीव गांधी यांचा जीव त्यामुळे गेला. कारण एक महिला आली तिने राजीव गांधी यांना भावा समान मिठी मारली. राहुल गांधी यांचेही असेच आहे. परंतु नरेंद्र मोदी यांच्याबाबत असे घडेल का? अशा खरमरीत शब्दात सोलापूर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर प्रहार केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते. वयस्कर महिला तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या.

हे ही वाचा : संजय राऊतांच्या भेटीला ठाणे पोलीस पोहोचले नाशिकला, हॉटेलमध्येच चौकशी सुरू

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का? राहुल गांधी यांच्याबद्दल बोलले जाते खरंतर हाच फरक आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासाठी प्रयत्नशील

राज्यात अंगणवाडी  सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले.  केंद्र सरकार हे गोरगरिबांचे सरकार नाहीये. महिलांचे तर नाहीच नाही.

हे ही वाचा : PHOTOS: मुंबईचे सम्राट, एक राहतो 1001 कोटींच्या घरात; रतन टाटांचं नाव तळाशी, कुणाचं घर किती महागडं?

महिलांकडे तुच्छ नजरेने बघते. महिलांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. महिलांना न्याय मिळवून देणारे तर दूरच. इंदिरा गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस सदैव सोबत असल्याचा विश्वास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, Narendra Modi, Rahul gandhi, Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur City North s13a248, Solapur news