जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात भीषण अग्नितांडवानंतर स्फोट, इमारत हादरली, दुचाकी जळाली, LIVE VIDEO

पुण्यात भीषण अग्नितांडवानंतर स्फोट, इमारत हादरली, दुचाकी जळाली, LIVE VIDEO

पुण्यात अग्नितांडव

पुण्यात अग्नितांडव

या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये दुकानाच्या मालकाचाही समावेश आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 04 मे : पुण्यात आगीची भयानक घटना घडली आहे. एका दुकानात अचानक आग लागली होती. आगीनंतर अचानक भीषण असा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की स्फोटात इमारतीची पडझड झाली आहे. या स्फोट 2 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका इमारतीतील 03 दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स आणि मोबाईल शॉपीची अशी दुकाने होती.

जाहिरात

घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या. याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतका भीषण होता की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा आणि इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. या स्फोटामध्ये एक दुचाकी पुर्ण जळाली आहे. (‘तू मला आवडत नाहीस..’; पतीच्या बोलण्याने तुटलं मन, विवाहितेचं धक्कादायक पाऊल) या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये दुकानाच्या मालकाचाही समावेश आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात, 4चार  ठार दरम्यान, सांगलीच्या विटा- महाबळेश्वर या राज्य मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील काशीद कुटुंबातील आहेत. हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान शिवाजीनगरच्या पुढे विटा हद्दीत झाला आहे. विटा पोलीस ठाण्यात अपघाताबात नोंद करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात