• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • अखेर भाजप आमदारांना जाग; Video viral झाल्यानंतर 5 दिवसांपूर्वीच आळंदीत साधेपणाने मुलीचं लग्न

अखेर भाजप आमदारांना जाग; Video viral झाल्यानंतर 5 दिवसांपूर्वीच आळंदीत साधेपणाने मुलीचं लग्न

आपल्या मुलीच्या लग्न समारंभातील मांडव डहाळ्याचा कार्यक्रमात महेश लांडगे आणि त्याच्या समर्थकांनी हळद उधळत भंडाऱ्यात नाहून नृत्य केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 • Share this:
  पिंपरी-चिंचवड, 31 मे : भारतीय जनता पार्टीचे (BJP) शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभेचे (Pimpari Chinchvad) आमदार महेश लांडगे यांना उपरती आली असून त्यांची कन्या साक्षी लांडगे आणि उद्योजक नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद यांचा विवाह आळंदीत अत्यंत साधेपणाने सोमवारी पार पडला. आज सकाळपासून या विवाहाची चर्चा राज्यभर पसरली होती. लग्नाआधी होणाऱ्या मांडव, डहाळे कार्यक्रमात आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करून नाचतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी कोरोना विरोधातील नियमांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट दिसत होते. यासंदर्भातील व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका केली जात होती. दुपारी व्हायरल झालेल्या या व्हिडीओंच्या आधारे आमदार  लांडगे त्यांचे भाऊ सचिन लांडगे, नगर सेवक आणि सुमारे 50 कार्यकर्त्यांविरुद्ध कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झाल्या प्रकरणाची चर्चा सुरू होते न होते तोच लांडगे यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडल्याची बातमी समोर आली आहे. हे ही वाचा-महत्त्वाची बातमी! 1 जूनपासून राज्यात नवे नियम, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती सूट? या विवाह सोहळ्या बाबत आमदारांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळातील प्रतिबंधात्मक नियमावलीमुळे साक्षी आणि निनाद यांचा विवाह तीर्थक्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिरासमोर अत्यंत साधेपणाने पार पडला. मात्र, वास्तविक हा विवाह सोहळा 6 जून रोजी होणार होता. राजस्थान किंवा गोवा येथे हा सोहळा पार पडणार होता. मात्र, लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करण्यात मर्यादा आल्या होता. त्यामुळे मांडव डळाळे ३० तारखेला आणि ३१ तारखेला विवाह असे नियोजन करण्यात आले होते. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मुलाचे लग्न २५ व्यक्तींच्या मर्यादेत उरकणे कठीण होते. त्यामुळे आज हा सोहळा नोंदणी पद्धतीने विवाह करून केवळ आठ जणांच्या उपस्थितीत पार पाडल्याचे कार्तिक म्हणाले. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्याकडून मांडव डहाळे कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात घडलेल्या चुकीची उपरती आल्यानेच त्यांनी आपल्या मुलीचा विवाह तडकाफडकी उरकला असल्याची चर्चा सध्या शहरात पसरली आहे. आपल्या मुलीच्या लग्न समारंभातील मांडव डहाळ्याचा कार्यक्रमात महेश लांडगे आणि त्याच्या समर्थकांनी हळद उधळत भंडाऱ्यात नाहून नृत्य केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला होणार आहे. त्यापूर्वीच्या मांडव डहाळ्याचा कार्यक्रम पार पडला होता. या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरताना या व्हिडीओत दिसत आहेत. तर सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे पायमल्ली या कार्यक्रमात करण्यात आली आहे. मांडव डहाळ्याचा कार्यक्रमासाठी वाजंत्री, बैलजोड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: