सुमित सोनवणे, प्रतिनिधी
दौंड, 01 फेब्रुवारी : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडलाआहे. भरधाव लक्झरी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्याच्या वाखारी गावच्या हदीमध्येमध्ये आज पहाटे हा अपघात झाला आहे. सोलापूरहून पुण्याकडे लक्झरी बस निघली होती. वाखारी गावाच्या हद्दीमध्ये टायर फुटल्यामुळे एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. भरधाव वेगात असताना अंदाज न आल्यामुळे बस ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. बसच्या एक बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
(पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात, गाडीचा ताबा सुटला अन् होत्याचं नव्हतं झालं! थरारक CCTV)
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अमर कलशेट्टी, गणपत पाटील, नितीन शिंदे आणि आरती बिराजदार अशी मृतांची नाव आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. काही जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले असून जखमींना केडगावमधील, चौफुला तसंच पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून बसमध्ये 35 प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात आली आहे. या भीषण अपघातात तीन जण पुण्यातील तर एक सोलापूरमधील महिलेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीसचा देखील समावेश आहे हा पोलीस कर्मचारी पुणे शहर पोलीस या ठिकाणी कार्यरत होते.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे
१) नितीन शिंदे (पुणे शहर पोलीस) मयत
२)अमर कलशेट्टी, कात्रज,मयत
३) गणपत पाटील, कात्रज, मयत
३) आरती बिराजदार, सोलापूर, मयत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.