पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात, ट्रकची 5 ते 6 गाड्यांना धडक, VIDEO

पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात, ट्रकची 5 ते 6 गाड्यांना धडक, VIDEO

मागिल महिन्यात 6 ऑक्टोबर रोजी सुद्धा याच ठिकाणी विचित्र अपघात झाला होता. एक भरधाव ट्रकने जवळपास 10 ते 15 गाड्यांना जोरात धडक दिली होती.

  • Share this:

पुणे, 02  नोव्हेंबर : पुणे (Pune) शहरातील नवले पूलाजवळ ( Navle bridge) विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने पाच ते सहा चारचाकी आणि दुचाकी वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील कात्रज बायपास रोडवर नवले पुलाखाली आज सकाळी पुन्हा एकदा विचित्र अपघात घडला. एका भरधाव ट्रकने जवळपास 5 ते 6 गाड्यांना जोराची धडक दिली. भरधाव ट्रक समोर येईल त्या वाहनांना चिरडत पुढे जात होता.

यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या अपघातामुळे नवले पुलाजवळ काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.  पोलिसांनी तात्काळ क्रेन लावून ही वाहनं बाजूला हटवल्याने तिथली वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

काँग्रेस जिल्ह्याध्यक्षाला 2 बहिणींनी चपलेनं धू-धू धुतलं, मारहाणीचा VIDEO VIRAL

मागिल महिन्यात 6 ऑक्टोबर रोजी सुद्धा याच ठिकाणी  विचित्र अपघात झाला होता. एक भरधाव ट्रकने जवळपास 10 ते 15 गाड्यांना जोरात धडक दिली होती.  हा ट्रक कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने चाललेला होता. अचानक टायर फुटल्यामुळे ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला. या भरधाव ट्रकने समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे गेला. यात  दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.  या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर  चार जण जखमी झाले होते.

Published by: sachin Salve
First published: November 2, 2020, 12:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या