काँग्रेस जिल्ह्याध्यक्षाला 2 बहिणींनी चपलेनं धू-धू धुतलं, मारहाणीचा VIDEO VIRAL

काँग्रेस जिल्ह्याध्यक्षाला 2 बहिणींनी चपलेनं धू-धू धुतलं, मारहाणीचा VIDEO VIRAL

दोन बहिणींपैकी एकजण चपल्लांनी कॉलर पकडून मारहाण करत होती तर दुसरी रस्त्यावर घेऊन चल आणखीन मार असं सांगत होती.

  • Share this:

लखनऊ, 02 नोव्हेंबर : काँग्रेस नेत्याच्या कॉलरला धरून महिलांनी चपलांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जालौनचे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष अनुज मिश्रा यांना बहिणींनी मिळून भररस्त्यात चपलांनी बदडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या एका व्हिडीओनं चर्चेला उधाण आलं आहे. कारण या व्हिडिओमध्ये जालौन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना दोन महिला मारहाण करत आहे. मिश्रा यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप या दोन महिलांनी केला आहे. एक महिला मिश्रा यांची कॉलर पकडून त्यांना चपलेनं बेदम मारहाण करत आहे तर दुसरी महिला त्याचा व्हिडीओ शूट करत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दुसरी महिला दीदी इथे नाही तर रस्त्यावर त्यांना घेऊन चलं असं म्हणताना दिसत आहे.

हे वाचा-बाबा का ढाबाला अच्छे दिन देणाऱ्या 'त्या' युट्यूबरविरुद्द तक्रार, लाखोंचा घोटाळा

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई रेल्वे स्थानकाजवळचा आहे. रेल्वे स्थानकावर जात असताना अनुज मिश्रा यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले आणि लैंगिक छळाचा देखील या महिलांनी आरोप केला आहे. त्यातील एक महिला सलवार कुर्ता तर दुसरी महिला जिन्स टॉपमध्ये आहे. एका महिलेनं मिश्रा यांच्या कॉलरला पकडून बेदम चप्पलने बेदम मारहाण करत असल्याचं तर दुसरी महिला त्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून उत्तर प्रदेशात या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: November 2, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या