सुमित सोनवणे, प्रतिनिधी
हवेली, 03 मार्च : देशभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात भरमसाठ वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला मोठी कात्री बसली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. अशातच पुणे (Pune) जिल्ह्यातील हवेली तालुक्यात उभ्या असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टँकरला भीषण आग लागली. या आगीत टँकर भक्षस्थानी सापडले.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर जवळ असलेल्या थेऊर फाटा इथं ही घटना घडली. या ठिकाणी पार्किंगला थांबलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या टँकंरला अचानक भीषण आग लागली.
ही आग रात्री बाराच्या दरम्यान लागली. आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खळबळजनक! भाजपा खासदाराच्या मुलावर बाइकस्वारांनी झाडल्या गोळ्या, आरोपी फरार
मात्र, पेट्रोल-डिझेलने भरलेला टँकर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेनंतर लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आणि डीवायएसपी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.