Home /News /pune /

पुण्यातील डॉक्टर दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची Update, रुग्णाचा फोन ठरला वादाचं कारण

पुण्यातील डॉक्टर दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची Update, रुग्णाचा फोन ठरला वादाचं कारण

पुण्यातील डॉक्टर दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची Update समोर आली आहे

    पुणे, 2 जुलै : गुरुवारी 'डॉक्टर डे'च्या (National Doctor's Day) दिवशीच पुण्यातील डॉक्टर दाम्पत्यानं (Doctor Couple) आत्महत्या (commits suicide) केली होती. यामुळे पुण्यात (Pune) खळबळ उडाली आहे. वानवडी येथील आझादनगरमध्ये हे डॉक्टर दाम्पत्य राहत होतं. डॉ. अंकिता शेंडकर आणि डॉ. निखिल शेंडकर अशी मृत डॉक्टर दाम्पत्यांचं नावं आहे. आता या डॉक्टर दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंकिता BHMS डॉक्टर आणि निखिल BAMS डॉक्टर होता. काही महिन्यांपूर्वीचं दोघांचं लग्न झालं होतं. दोघंही वानवडी भागातील आझादनगरमध्ये एका बंगल्यात राहत होते. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल पुण्यातील करसुर्डी (Karsurdi village near Yavat in Pune district) गावाजवळील यावत येथे डॉक्टरकीची प्रॅक्टिस करीत होता. तर अंकिता वानवडी येथील एका क्लिनिकमध्ये काम करीत होती. बुधवारी निखिलला त्याच्या एका रुग्णाकडून फोन आला होता. त्याच्या रुग्णाला मानसिक आजार होता. मात्र तो करसुर्डी येथे असल्याने त्याने पत्नी अंकिताना रुग्णाला अटेंड करण्यास सांगितलं. मात्र तिने यासाठी नकार दिला, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे. यावरुन दाम्पत्यांमध्ये फोनवरुन वाद सुरू झाला. लग्नानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन वाद सुरू होत्या. त्या दिवशीही रुग्णावरुन दोघांमधील वाद टोकाला गेला. मोबाइलवरील वादानंतर  सायंकाळी निखिल घरी पोहोचला तेव्हा अंकिताने वानवडी येथे घरी गळफास घेऊन आत्महत्या (Ankita hanging from the ceiling in a room) केली होती. हे पाहून त्याला धक्काच बसला. यानंतर निखिलने पोलिसांना बोलावलं आणि तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै रोजी निखिलने देखील घरातील बाथरुममध्ये (bathroom ceiling) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्याने एक सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येमागे कोणालाही जबाबदार धरू नये, असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं. पोलिसांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली. हे ही वाचा-धक्कादायक, पुण्यात डॉक्टर डे दिवशीच डॉक्टर पती- पत्नीनं संपवलं जीवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकाम करणारी महिला नोकर सकाळी घरी गेल्यावर या घटनेचा उलगडा झाला. बऱ्याच वेळ दार न उघडल्यानं महिलेनं शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजारच्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Doctor couple suicide, Husband suicide, Pune, Pune crime news

    पुढील बातम्या