पुणे, 25 फेब्रुवारी : लग्नाचे नऊ दिवस संपले की, नवरा-बायकोमध्ये कसे वाद होता हे काही नवीन सांगण्याचे काम नाही. त्यामुळे आपल्या संसारात वाद, भांडण होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका तरुण आणि तरुणी चक्क करारनामा करून लग्न केलं आहे. त्यांच्या करारनाम्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्न म्हटलं की, नवरा नवरी यांचे एक नव आयुष्य सुरू होतं असतं. यामध्ये दोघेही नव्या आयुष्याच्या सुखी संसाराची स्वप्न पहातात. मात्र ही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घ्यावं लागतं. मात्र एकमेकांना समजून घेत आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील नवरदेव कृष्णा लंबे आणि जुन्नरच्या नारायणगाव येथील नवरी मुलगी सायली ताजणे यांचा विवाह सोहळा मंचर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात संपन्न झाला. (Pune Love Marriage Crime : प्रेमविवाह केला, मुलीच्या घरच्यांना सहन झालं नाही) असा आहे “लग्नाचा करारनामा” 1) कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल. 2) सायली : मी कृष्णाकडे शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही. 3) सायली : मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीला जायला अडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा) 4) कृष्णा : मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल. 5) सायली : मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल. 6) आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू. अशा या सहा अटींवर हा लग्न सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यात हा अगळावेगळा लग्नाचा करारनामा करण्यात आला. एका पांढऱ्या बोर्डवर हा करारनामा छापण्यात आला होता. (विद्यूत दाहिनीचा फ्यूज उडाला, अर्धवट जळालेला मृतदेह; वसंत मोरेंनी काही मिनिटात केली मदत) यावेळी नवरा मुलगा-मुलगी आणि साक्षीदार म्हणून मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनीही स्वाक्षरी केली. सायली आणि कृष्णा आता लग्नबेडीत अडकले आहे. त्यामुळे लग्नाचा करार तंतोतत पाळला जाईल, अशी अपेक्षा वऱ्हाडी मंडळींनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.