मुंबई, 23 फेब्रुवारी : कात्रजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीच्या मशीनचे फ्यूज उडाल्याची घटना घडली. यानंतर विद्युत दाहिनीतील मृतदेह अर्धवट जळाल्यानं कामगार घाबरले. त्यावेळी कामगाराने मनसेचे नेत वसंत मोरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. तेव्हा वसंत मोरे यांनी तात्काळ कामगारांच्या मदतीसाठी धाव घेतली. वसंत मोरे यांनी याबाबत फेसबकुवर पोस्ट लिहून माहिती दिलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कात्रजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत एक मृतदेह अंत्यविधीसाठी सोडण्यात आला होता. तेव्हा अचानक विद्युत दाहिनीच्या मशीनचे फ्यूज उडाले. यातला मृतदेह अर्धवट जळाला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कामगार घाबरला होता. दरम्यान, मशीन दुरुस्त करणारा २ तासात न आल्यानं घाबरलेल्या कामगाराने रात्री साडे अकरा वाजता वसंत मोरे यांना फोन केला. हेही वाचा : श्रीकृष्ण कर्वे गुरुजींचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास वसंत मोरे यांना फोन येताच त्यांनी ठेकेदार आणि मेंटन्सनवाल्यांना फोन केला. तसंच दोन तासात विद्युत दाहिनी दुरुस्त होऊन अंत्यसंस्कार झाले नाहीत तर मी स्वत: तिथे जाऊन लाइव्ह करेन. यानंतर पुढे जे काही घडेल त्याला तुम्ही जबाबदार असाल असा इशारासुद्धा दिला. वसंत मोरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर तासाभरात विद्युत दाहिनी दुरुस्त झाली.
वसंत मोरे काय म्हणाले? मशीन नादुरुस्त झाल्यानं मृतदेह अर्धवट जळाला होता. दुसऱ्या दिवशी संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक रक्षाविसर्जनासाठी येणार होते. त्यामुळे या मुद्द्यावरून वादही झाला असता आणि याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांना नोकरीही गमवावी लागली असती असंही वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.